सखी'चे पत्र (3).. हरवलेल्या 'मी' च्या शोधात!
पत्र तिसरे प्रिय अमर, काही माणसं आपल्या आयुष्यात आली की, आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी फार बदलल्या सारख्या वाटतात...तुला हे.. असे..वाटले का रे कधी..??.. म्हणजे बघ हं...घडणार्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी या काही त्या व्यक्ती मुळे घडत नाहीत....पण त्याच्या सोबत असल्यामुळे आपण मात्र खूप उर्जित होतो...आणि ही ऊर्जाच आपल्या बदलाला कारणीभूत ठरते...ती माणसे फक्त निमित्तमात्र..! तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझी आवडती माणसे होतीच की अवतीभोवती...पण तरीही एक पोकळी निर्माण झाली होती....जी तुझ्या येण्याने अगदी काठोकाठ भरून गेली. तुला प्रश्न पडला असेलच..असे कसे..?. ...कारण अशा कोणत्याच भावनिक गुंतागुंतीत आपण अडकलो नव्हतो.. किंवा ज्याला कमिटमेन्ट म्हणतात असेही काहीच नव्हते. मग माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने इतका फरक का पडावा...???... नाही...तुला हे वाटणे आणि असले प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे... कारण फ...