आयुष्य.. म्हणजेच सहजसुंदर देवाणघेवाण !



आयुष्य..


नदीला फिरताच येत नाही मागे 

म्हणुनच ती वहात जाते आवेगाने..

समुद्राच्या मिठीत स्वः अस्तित्व विसरायला!!


त्याच्या मनाची खोली कधीही मोजता न येणारी 

तिच्या सारख्या अनेकींचे विश्व व्यापून टाकणारी 

एवढी विशालता त्याच्या निस्सीम अथांगतेला!!


तरीही त्याला कधीच वाढवता येत नाहीत त्याच्या मर्यादा

चौकटीतील आयुष्य तो नाकारू शकत नाही.

त्याची शांतता हे नक्की कशाचे प्रतीक समजावे..?


नदी असते खळखळणारी..

प्रवाहा सोबत आनंद वाटणारी..

आपला गोडवा समुद्राला देऊन 

त्याचे खारेपन सहज स्विकारणारी..


दोघेही संपूर्ण, एकमेकांना समर्पक 

एकमेकात मिसळून सुद्धा 

आपलेपण जपणारी..


तिने कधीच स्वतःला बदलले नाही 

आणि त्याने कधीही तसा अट्टाहास धरला नाही..

तिने झोकून दिले नि त्याने सहज स्विकारले..!!


ही सहजसुंदर देवाणघेवाण म्हणजेच आयुष्य..!!

                                                  - तेजश्री शिंदे 


Comments

  1. प्रेम आणि मैत्री अशीच असते ना?
    स्वतःचा गोडवा देऊन त्याचा खारटपणा स्वीकारणारी...
    खूप छान उपमा देऊन आयुष्याच्या देवाणघेवाणीची तुलना केली आहे.
    आपल्याला समुद्राचा संयम आणि नदीचा अवखळपणा घेता यायला हवा.

    ReplyDelete
  2. एवढ्या सखोल समीक्षेकरीता धन्यवाद सुहास..!

    ReplyDelete
    Replies
    1. कविता खूप छान आहे. मी रिया गावडे ची मैत्रीण आहे धन्यवाद कविता शेअर केल्याबद्दल

      Delete
  3. नदी...
    ना बोलते ना हसते
    एकट्यांसाठी क्षणभराची साथी बनते,
    मिळेल ते घेऊन आणि असेल ते देऊन
    सदैव आपली वाहत रहाते.
    मॅडम ..खूपच छान कविता सादर केली तूम्ही..
    नदीसारख प्रेम देता आले पाहिजे... समुद्रसारखा संयम बाळगला पाहिजे...



    ReplyDelete
  4. जशी नदीची महिमा थोर तसा समुद्राचा गहिरापणा भी थोर असतो

    ReplyDelete
  5. जे हवं ते बोलून गेलात, आपल्या भावना हृदयाला स्पर्शुन गेल्या.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.