गझल: रक्तबंबाळ चांदणे
गझल: रक्तबंबाळ चांदणे
तुझे असणे जणू काचेवरी नक्षी हिऱ्याची,
उगा चवीला तरीही धार ल्याली पाहिजे;
तू उजळावे असे की काळोखही व्हावा ऋणी—
रात्र ओल्या चांदव्याने रक्तबंबाळ न्हाली पाहिजे.
असा कसा तू मला देण्या आलास 'जगणे'?
आता मरणास ही खुळी आस लागली पाहिजे.
अंधाऱ्या वाटेवरी तू चांदवा होऊनी यावे,
पाहता तुला हे जग मी विसरून गेली पाहिजे.
फक्त एकदा तरी तू माझ्या डोळ्यात पहा,
मनातली सारी वेदना तुझ्या ओठी आली पाहिजे.
कुणीतरी भटासम 'एल्गार' पुकारावा असा,
अखंड या गझलेला तूच दाद दिली पाहिजे.

अप्रतिम! 'रात्र ओल्या चांदव्याने रक्तबंबाळ न्हाली पाहिजे' - ही ओळ म्हणजे निव्वळ कविता नाही, तर एक जिवंत चित्र आहे. विरहाचा आणि प्रेमाचा असा उत्कट आविष्कार क्वचितच वाचायला मिळतो.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏
Delete❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ReplyDeleteगझल वाचताना सुरेश भटांची आठवण झाली. सुरेश भटांचा एल्गार नावाचा गझल संग्रह आहे. हा तुझं एल्गार सुद्धा असाच आहे . अतिशय कमालीच्या प्रतिभा शक्तीची उच्च कोटी आणि परस्परविरोधाभास कल्पक शक्तीच्या मांडणीतून एक नवा भावाविष्कार या गझल मध्ये एकत्रितरित्या प्रत्ययास येतो. 👍👍 खूप सुंदर..
ReplyDeleteThank you 😊
Deleteखुप सुंदर व भावस्पर्शी तेजश्री
ReplyDelete💖💖💖✍️✍️✍️✍️
ReplyDelete"विरहाचं दुःख शब्दांत मांडणं कठीण असतं, पण तुम्ही ते एखाद्या चित्रासारखं उभं केलं आहे. गझलेतील मतला आणि मक्ता दोन्हीही प्रभावी आहेत. विरहाच्या वेदनेला तुम्ही दिलेली ही साहित्याची झालर खरोखरच कौतुकास्पद आहे."तेजश्री मॅडम खूप छान
ReplyDeleteThank you so much
Deleteखूप छान लिहिले आहे, शब्द शब्द पारखून लिहिला आहे.
ReplyDeleteखूप छान तेजश्री
ReplyDeleteप्रेम विरह जिव्हाळा व नात्याची गुंफण या सर्वांचा परिपाक म्हणजे आपली ही गझल.
ReplyDeleteThank you
Deleteअतिशय मार्मिक शब्द रचना आणि जीवनातल्या काही आठवणीना उजाळा. माणूस ह्या सर्व आठवणी बरोबर लहानाचा मोठा होतो. उत्कृष्ट खूप सुंदर!!!!!।👌👌👏👏
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏
Delete