अमरचे पत्र (६)....'समांतर पात्रांमधील अथांग डोह'
वाचकांसाठी… सखीच्या निःस्वार्थ, प्रेमळ पत्रावर अमरचे हे उत्तर... आजचा "विशेष"! कधी कधी माणसाला स्वतःच्याच भावनांची खरी ताकद तेव्हा कळते, जेव्हा त्या गमावण्याची एक अनामिक भीती मनात जागी होते. सखीच्या पत्राने आज अमरला आतून हलवून सोडले आहे. नेहमी गंभीर आणि संयमी राहणारा अमर आज चक्क कबूल करतोय— "कळत-नकळत मला तुझी केवढी तरी मोठी सवय झाली आहे... तुझ्याशिवायच्या जगाची अशी कल्पनासुद्धा नको वाटते मला!" शब्दांच्या पलीकडचे हे नाते, ओटावाच्या त्या गोठलेल्या रात्रीत उमटलेला हा आर्त सूर, आणि दोघांच्या नात्याला मिळालेली ही एक नवी प्रगल्भ दिशा... नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अमरचे हे पूर्ण पत्र आणि या मालिकेतील मागील सर्व भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा. 👇 https://tejashrishinde.blogspot.com/2026/05/5.html ******** अमरचे पत्र (६) 'समांतर पात्रांमधील अथांग डोह' प्रिय सखी, तुझं पत्र आलं आणि मी कित्येक प्रहर फक्त त्या उघड्या पानाकडे पाहत स्तब्ध बसून राहिलो. ...