Posts

Showing posts from May, 2023

पुन्हा एकदा प्रेम करावे !

Image
  पुन्हा एकदा प्रेम करावे. वसंत बहरून आला परतून  हाक मारण्या प्रिय नसावा.. दबकत यावे स्वप्नांनी त्या  कासावीस तो जीव दिसावा.. पुन्हा एकदा बहरावे का? का? पुन्हा एकदा प्रेम करावे..                                     विसरून सारे परतून यावे  पुन्हा एकदा अंकुरित व्हावे.. फुलवावा मधुमास असा की शब्द सुगंधी उमलून यावे..  पुन्हा एकदा बहरावे अन्  पुन्हा एकदा प्रेम करावे.. ओंजळीतले रिते करूनी  विश्वासाने पुन्हा भरावे.. अवचित सारे घडले तरीही  देणाऱ्याचे हात व्हावे.. पुन्हा एकदा बहरावे अन्  पुन्हा एकदा प्रेम करावे..                                            - तेजश्री शिंदे 

कोनशिला (कविता)

Image
  कोनशिला   ​"बुद्धिस्ट हायस व्हय...?" तिच्या या साध्या, रांगड्या प्रश्नाने मी मात्र पुरती बुचकळ्यात पडले. माझ्या वैचारिक श्रीमंतीचे इमले एका क्षणात कोसळून पडले. ​"न्हाई, ते स्टेटस ठिवलंय ना तुम्ही आज... म्हणून ईचारलं, तुम्ही आमच्यातलेच ना?" ​तिचा तो प्रश्न, तो 'आमच्यातले'पणाचा शोध, माझ्या पदव्यांना, माझ्या वाचनाला टोचणी लावून गेला. मी बुद्ध वाचला, बुद्ध ऐकला, बुद्ध मांडलाही... पण तो रक्तात भिनायचा मात्र राहूनच गेला. तत्त्वज्ञानाच्या जगात मी विहारासारखी सजले, पण प्रत्यक्ष जगताना जुन्याच कोशात रूतून बसले. ​छे! बुद्धिहीन गलबतात अडकलेले माझे विचार, आणि त्यावर साचलेले पूर्वग्रहांचे मळभ... तिच्या त्या एका प्रश्नाने, माझ्या तथाकथित प्रगल्भतेचे मुखवटे गळून पडले. ​वाचन केवळ अनुभूती देते, पण विचारांचा विकास तर संघर्षातून होतो. संस्कृती, इतिहास आणि भोवतालच्या घटनांचे पाश, पायांत बेड्या बनून जखडलेले असतात. जाणीवपूर्वक हे पाश तोडण्याचा सराव करावा लागतो, स्वतःला स्वतःविरुद्धच सिद्ध करावं लागतं. ​कदाचित तेव्हाच... सहजतेने सामोरे जाता येईल तिच्या प्रश्नाला. आणि नव्याने पाह...