Posts

Showing posts from October, 2026

शांति का सच (कविता)

Image
  शांति का सच ​मैं दुनिया के सामने  एक ठहरी हुई झील बने रहने का ढोंग करती हूँ।  ​मगर डर इस बात का नहीं होता  कि कोई और उसमें पत्थर फेंकेगा;  डर इस बेचैनी का है  कि क्या यह ठहराव सचमुच है?  ​और इसी शक़ को परखने के लिए  मैं ख़ुद अपने ही हाथों से  उसमें एक कंकड़ उछाल बैठती हूँ,  ​और उठती हुई लहरें  मेरी सारी शांति का सच  किनारे तक बहा लाती हैं। - तेजश्री शिंदे ✍️

कळून आले (कविता)

Image
  कळून आले.. उन्हात चालतानाच सावलीचे मोल कळून आले अंधार दाटल्यावर दिव्याचे जळणे कळून आले..! ​दिला नाही दोष वादळाला घर मोडल्याचा कधी मातीच्या कणांसंगे पुन्हा उभे राहणे कळून आले..! ​तुटून पडले पान तरी झाडाने शोक केला नाही ऋतूबरोबर शांतपणे स्वतःला सावरणे कळून आले..! ​कधी मागितला नाही पुरावा कोणाकडून प्रेमाचा आपल्याच माणसांचे मुके वार सोसणे कळून आले..! ​उसवले होते आयुष्य ज्या एकाच उंबऱ्याशी त्या जुन्या वाटेवरून शांतपणे वळणे कळून आले..! ​आरशासमोर उभी राहिले नि:शब्द होऊन मी गर्दीत या जगाच्या एकाकी उरणे कळून आले..! ​कासावीस जीव झाला तरी पाणावले नाहीत डोळे तुला तुझेच तेज जपणे, तेजश्री, कळून आले..! - तेजश्री शिंदे ✍️