गझल: रक्तबंबाळ चांदणे
गझल: रक्तबंबाळ चांदणे तुझे असणे जणू काचेवरी नक्षी हिऱ्याची, उगा चवीला तरीही धार ल्याली पाहिजे; तू उजळावे असे की काळोखही व्हावा ऋणी— रात्र ओल्या चांदव्याने रक्तबंबाळ न्हाली पाहिजे. असा कसा तू मला देण्या आलास 'जगणे'? आता मरणास ही खुळी आस लागली पाहिजे. अंधाऱ्या वाटेवरी तू चांदवा होऊनी यावे, पाहता तुला हे जग मी विसरून गेली पाहिजे. फक्त एकदा तरी तू माझ्या डोळ्यात पहा, मनातली सारी वेदना तुझ्या ओठी आली पाहिजे. कुणीतरी भटासम 'एल्गार' पुकारावा असा, अखंड या गझलेला तूच दाद दिली पाहिजे. - तेजश्री शिंदे ✍️