Posts

शांति का सच (कविता)

Image
  शांति का सच ​मैं दुनिया के सामने  एक ठहरी हुई झील बने रहने का ढोंग करती हूँ।  ​मगर डर इस बात का नहीं होता  कि कोई और उसमें पत्थर फेंकेगा;  डर इस बेचैनी का है  कि क्या यह ठहराव सचमुच है?  ​और इसी शक़ को परखने के लिए  मैं ख़ुद अपने ही हाथों से  उसमें एक कंकड़ उछाल बैठती हूँ,  ​और उठती हुई लहरें  मेरी सारी शांति का सच  किनारे तक बहा लाती हैं। - तेजश्री शिंदे ✍️

कळून आले (कविता)

Image
  कळून आले.. उन्हात चालतानाच सावलीचे मोल कळून आले अंधार दाटल्यावर दिव्याचे जळणे कळून आले..! ​दिला नाही दोष वादळाला घर मोडल्याचा कधी मातीच्या कणांसंगे पुन्हा उभे राहणे कळून आले..! ​तुटून पडले पान तरी झाडाने शोक केला नाही ऋतूबरोबर शांतपणे स्वतःला सावरणे कळून आले..! ​कधी मागितला नाही पुरावा कोणाकडून प्रेमाचा आपल्याच माणसांचे मुके वार सोसणे कळून आले..! ​उसवले होते आयुष्य ज्या एकाच उंबऱ्याशी त्या जुन्या वाटेवरून शांतपणे वळणे कळून आले..! ​आरशासमोर उभी राहिले नि:शब्द होऊन मी गर्दीत या जगाच्या एकाकी उरणे कळून आले..! ​कासावीस जीव झाला तरी पाणावले नाहीत डोळे तुला तुझेच तेज जपणे, तेजश्री, कळून आले..! - तेजश्री शिंदे ✍️ 

अमरचे पत्र (६)....'समांतर पात्रांमधील अथांग डोह'

Image
  वाचकांसाठी… ​ सखीच्या निःस्वार्थ, प्रेमळ पत्रावर अमरचे हे उत्तर... आजचा "विशेष"! ​कधी कधी माणसाला स्वतःच्याच भावनांची खरी ताकद तेव्हा कळते, जेव्हा त्या गमावण्याची एक अनामिक भीती मनात जागी होते. सखीच्या पत्राने आज अमरला आतून हलवून सोडले आहे. नेहमी गंभीर आणि संयमी राहणारा अमर आज चक्क कबूल करतोय— "कळत-नकळत मला तुझी केवढी तरी मोठी सवय झाली आहे... तुझ्याशिवायच्या जगाची अशी कल्पनासुद्धा नको वाटते मला!" ​ शब्दांच्या पलीकडचे हे नाते, ओटावाच्या त्या गोठलेल्या रात्रीत उमटलेला हा आर्त सूर, आणि दोघांच्या नात्याला मिळालेली ही एक नवी प्रगल्भ दिशा... ​नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. ​ अमरचे हे पूर्ण पत्र आणि या मालिकेतील मागील सर्व भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा. 👇 https://tejashrishinde.blogspot.com/2026/05/5.html ******** अमरचे पत्र (६) 'समांतर पात्रांमधील अथांग डोह' ​ प्रिय सखी, ​            तुझं पत्र आलं आणि मी कित्येक प्रहर फक्त त्या उघड्या पानाकडे पाहत स्तब्ध बसून राहिलो. ​           ...

पानगळीत हरवलेला पाऊस....सखी'चे पत्र (9)

Image
वाचकांसाठी… ​ “काही नाती आपल्यासोबत राहण्यासाठी नसतातच... ती आपल्यातून जाण्यासाठी येतात. जसा एखादा ऋतू. जसं एखादं पुस्तक, जे वाचून झाल्यावर कपाटात ठेवून देतो, पण त्यातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्षं आपल्यासोबत चालत राहतं...” ​             सखीच्या पत्रातील ही ओळ काळजाला अशी काही भिडते, की आपण नकळत जुन्या दिवसांच्या आठवणीत हरवून जातो. ​आजच्या "विशेष" भागात सखीने अमरला लिहिलेलं हे पत्र केवळ शब्दांचं नाही, तर ते एका ओल्या, मातीच्या सुगंधाने भारलेल्या शांत संध्याकाळचं प्रतीक आहे. ​             एकाच वेळी बुद्धीला विचार करायला लावणारी आणि मनाला हळूवार स्पर्श करणारी ही पत्रमालिका...खास तुमच्यासाठी! ​ वाचा आणि तुम्हाला यातली कोणती ओळ सर्वात जास्त आपली वाटली, ते नक्की सांगा. ​ अमर आणि सखी — यांची मागील सर्व पत्रे वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर नक्की क्लिक करा. 👇 https://tejashrishinde.blogspot.com/2026/05/5.html ********* “पानगळीत हरवलेला पाऊस”   सखी'चे पत्र (९) ​ प्रिय अमर, ​           तुझ्या...

प्रेम में नहीं रहेंगे... तो कहाँ रहेंगे?

Image
  ग़ज़ल उम्र ने जिस्म से हर रंग उधार ले लिया, मोहब्बत ने मगर रूह को जवान रखा। वक़्त बुझा न सका इश्क़ का एक भी चराग़, राख हो गई रात, नूर ने आसमान रखा। धूप ने चेहरे की हर सिलवट गिनी मगर, तेरी याद ने दिल को सदा गुलिस्तान रखा। हज़ार आँधियाँ आईं, हज़ार मौसम गुज़रे, एक तेरे यक़ीं ने मेरा आशियाँ रखा। झुर्रियाँ तो फ़क़त वक़्त की तहरीर ठहरीं, दिल ने हर धड़कन में पहला-सा अरमान रखा। लोग कहते रहे इश्क़ उम्र के साथ ढलता है, हमने हर साँस में उसे और जवान रखा। जो बिछड़ भी गए, वो कहाँ दूर हुए हमसे, रूह ने रूह का रिश्ता सदा बे-ज़ुबान रखा। 'तेज' ये फ़ैसला भी बड़ी देर में समझ आया— जिसने मोहब्बत बचाए रखी, उसी ने जहान रखा। - तेजश्री शिंदे ✍️ 

अंतरीचा विठ्ठल ( अभंग )

Image
  वारी : भक्तीचा चालता-बोलता सोहळा               महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत वारी हे केवळ एक धार्मिक पर्व नाही... ती माणसाला माणसाशी आणि माणसाला स्वतःशी जोडणारी एक अद्भुत जीवनदृष्टी आहे. शतकानुशतके संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ आणि असंख्य वारकऱ्यांनी या परंपरेला आपल्या पावलांनी, अभंगांनी आणि निस्सीम भक्तीने समृद्ध केले आहे.               वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नव्हे...ती अहंकारापासून नम्रतेकडे, अस्वस्थतेपासून शांततेकडे आणि 'मी'पासून 'आपण'कडे नेणारा अंतर्मनाचा प्रवास आहे. या प्रवासात टाळ-मृदंगाचा नाद हा केवळ संगीत राहत नाही, तो नामस्मरणाचा श्वास बनतो. चंद्रभागेचे पाणी केवळ शरीराला स्पर्श करत नाही, तर मनावर साचलेली काळजी, दुःख आणि थकवा धुऊन काढते.               विठ्ठल हा विटेवर उभा असलेला देव असला, तरी त्याची खरी भेट मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हे, तर भक्ताच्या निर्मळ भावात घडते. म्हणूनच वारी संपते पंढरपुरात; पण विठ्ठलाचा प्रवास तेव्हाच सुरू होतो...

अपूर्णतेचा उत्सव: 'वाबी-साबी'

Image
  अपूर्णतेचा उत्सव: 'वाबी-साबी'              ​ आपण एका अशा जगात जगत आहोत, जिथे प्रत्येक गोष्टीमध्ये 'परिपूर्णता' शोधण्याचा एक अघोषित अट्टाहास सुरू आहे. सुंदर दिसणं, यशस्वी होणं, नाती टिकवणं... या सगळ्यावर हुकमी परिपूर्णतेचा एक दबाव सतत असतो. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. निसर्ग कधीच सरळ रेषेत चालत नाही. तो वळणावळणांचा, सुकलेल्या पानांचा आणि कोसळणाऱ्या ऋतूंचा स्वीकार करतो. ​ जपानी संस्कृतीमध्ये एक अतिशय देखणी संकल्पना आहे—'वाबी-साबी' (Wabi-Sabi). ​              'वाबी-साबी' म्हणजे अपूर्णतेमध्ये, निसर्गाच्या अनित्यतेमध्ये आणि काळाच्या ओघात झिजलेल्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधण्याची कला. तुटलेलं मडकं, जुनी झालेली भिंत, किंवा आयुष्याच्या संघर्षात चेहऱ्यावर उमटलेल्या सुरकुत्या... या गोष्टी कुरूप नसून, त्यांच्याकडे स्वतःचा एक समृद्ध इतिहास आहे, हा विचार म्हणजे वाबी-साबी.              ​ जेव्हा एखादी चिनी मातीची मौल्यवान वस्तू तुटते, तेव्हा जपानमध्ये ती फेकून न देता सोन्याच्या रसाने सांधली ...