कळून आले (कविता)

 


कळून आले..


उन्हात चालतानाच सावलीचे मोल कळून आले

अंधार दाटल्यावर दिव्याचे जळणे कळून आले..!


​दिला नाही दोष वादळाला घर मोडल्याचा कधी

मातीच्या कणांसंगे पुन्हा उभे राहणे कळून आले..!


​तुटून पडले पान तरी झाडाने शोक केला नाही

ऋतूबरोबर शांतपणे स्वतःला सावरणे कळून आले..!


​कधी मागितला नाही पुरावा कोणाकडून प्रेमाचा

आपल्याच माणसांचे मुके वार सोसणे कळून आले..!


​उसवले होते आयुष्य ज्या एकाच उंबऱ्याशी

त्या जुन्या वाटेवरून शांतपणे वळणे कळून आले..!


​आरशासमोर उभी राहिले नि:शब्द होऊन मी

गर्दीत या जगाच्या एकाकी उरणे कळून आले..!


​कासावीस जीव झाला तरी पाणावले नाहीत डोळे

तुला तुझेच तेज जपणे, तेजश्री, कळून आले..!


- तेजश्री शिंदे ✍️ 

Comments

  1. तुझ्या कवितेत मी तुलाच वाचलं ग,
    हरवूनही स्वतःला सावरलेलं पाहिलं ग...
    वादळात दिवा विझला नाही तुझा,
    तू अंधारालाच उजेड द्यायला शिकवलीस ग.

    तुझ्या शब्दांत वेदना नाही, तर जगण्याची ताकद आहे तेजश्री...
    तू मोडली नाहीस, तू स्वतःला नव्याने घडवलेस...
    उन्हातून सावलीपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता,
    पण तू तुझं तेज कधीच विझू दिलं नाहीस, याचा मला अभिमान आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  2. अप्रतिम शब्दरचना....!

    ReplyDelete
  3. तुझ्या अर्थपूर्ण कवितांमुळे...

    आम्हास देखील तुझ्यात कवयित्री असल्याचे कळून आले

    ReplyDelete
  4. सुंदर

    ReplyDelete
  5. खुप सुंदर तेजश्री

    ReplyDelete
  6. खूप छान 👌👌👌

    ReplyDelete
  7. किमान तुला हे कळून आले.....नाहीतर उभा जन्म वाया जातो "मी" समजून घेता घेता

    तुटून पडले पान तरी झाडाने शोक केला नाही
    ऋतूबरोबर शांतपणे स्वतःला सावरणे कळून आले..!

    निव्वळ अप्रतिम!

    ReplyDelete
  8. जीवनाच्या वाटेवर नव नवीन
    अनुभवाचे क्षण,कधी कविता,
    कधी गझल स्वरूपात अशाच
    वाचनास मिळोत...सुंदर

    ReplyDelete
  9. फार सुंदर कविता. एका पोलीस अधिकाऱ्याचे कवी मन.......

    ReplyDelete
  10. खूप छान कविता 👍🙏

    ReplyDelete
  11. खूप छान कविता
    धन्यवाद मॅडम

    ReplyDelete
  12. खूप छान तेजश्री 👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

गझल: रक्तबंबाळ चांदणे