ओनामा....अर्थात आरंभ..!
ओनामा....अर्थात आरंभ..!
अनेक मित्र मंडळींच्या आग्रहास्तव Blog लिहिण्याची सुरुवात या वर्षापासून करत आहे. खर तर पूर्वी डायरी लिहायची सवय होती...कालांतराने ती सवय मोडली... आणि लिहिलेल्या अनेक कविता, लेख....या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्यामुळे विखुरल्या गेल्या. माझे एकंदरीत सर्व लिखाण हे एका जागी संकलित व्हावे व सगळ्यांसाठी ते उपलब्ध रहावे म्हणून मित्रांच्या आग्रहास्तव केलेली ही सुरुवात...!
या Blog ला काय नाव द्यावे याचा विचार करत असताना अनेक गोष्टी इतिहासासारख्या डोळ्यासमोरून झरझर ओझरत गेल्या. काहीही झाले आणि कितीही नकारात्मक गोष्टी घडल्या तरी त्या गोष्टीची पुन्हा नव्याने सुरुवात करणे हा माझा स्थायीभाव आहे...! त्यामुळेच कदाचित त्याच त्याच गोष्टी मी पुन्हा नव्याने पहात त्यांना नव्या अर्थाने समजून घेत जाते. माझे हे मूल्य मला "जीवनमूल्य" म्हणून खूप महत्वपूर्ण वाटते.
आपण सगळेच काळाच्या चौकटीत जगत आहोत... त्यामुळे एखादा क्षण निसटून गेल्यावर तो पुन्हा जसाच्या तसा अनुभवता येतच नाही... प्रसंग सारखा असला तरी व्यक्तीची समज बदललेली असते...त्यामुळे पुन्हा तो अनुभव आहे तसा भेटणे, उपभोगणे अशक्यच.
एकदा का ही गोष्ट आपल्या लक्षात आली की अनेक गोष्टी सहज होत जातात.... मनात कोणताही तिढा न ठेवता आपण त्याच त्याच प्रसंगांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहू लागतो... हे नव्याने गोष्टींकडे पहात केलेली सुरुवात म्हणजे "ओनामा"....अर्थात आरंभ..!
हा ओनामा... नवीन विचारांचा आहे, नवीन दृष्टीकोनाचा आहे, पुन्हा नव्याने जगण्याचा आहे. एक स्त्री म्हणून, अधिकारी म्हणून, मुळात एक माणूस म्हणून येणार्या नव जाणीवांसह नव अनुभवांचा अन् अनुभूतींचा आहे.
तुम्हा वाचकांच्या समोर हा "ओनामा" घेऊन येताना मनात अनेक विचार होते...परंतु अगदी थोड्याच कालावधीत तुम्ही दिलेला हा प्रतिसाद माझ्यासाठी नक्कीच सुखद आहे. मी माझे विचार कविता, लेख, कथा इत्यादी माध्यमांतून वेळोवेळी आपल्या समक्ष सादर करत राहील.
आपण दिलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद!


👏👏👏👏👏🙏🙏
ReplyDeleteThank you.
Deleteवाह! खूप छान संकल्प केला आहे.
ReplyDeleteहा ओनामा असाच निरंतर राहू दे...
खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐
धन्यवाद सुहास..!
Deleteछान.. असेच लेख, कविता सादर करीत रहा. वाचायला खूप आवडेल. All The Best Madam 💖👍
ReplyDeleteThanks Riya..!
DeleteGood going दी ❤️ खुप छान आरंभ.
ReplyDeleteThank you 😊
ReplyDelete