अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )
अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...

मोगरा ही तुला बेधुंद कराया अधिर आहे.
ReplyDeleteसुगंध तर तुझ्या प्रत्येक शब्दात आहे
या शब्द सुमनांसाठी धन्यवाद 🙏
Deleteखूप छान मॅडम 😘
Deleteअद्वितीय 💗
Delete❤️ खुप छान ❤️
ReplyDeleteछान शब्दरचना आहे
ReplyDeleteअप्रतिम 👍👍💞💞💞
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteVery beautiful as always👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete❤️ अप्रतिम ❤️👏👏👏
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDeleteBeautiful
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteतेजू नुकतेच तुझे "अमर आणि सखी"
ReplyDeleteपत्र वाचले.... आणि आता ही गझल म्हणजे दुग्ध शर्करा योग! यातून सहज सुचले... जर ही गझल सखीने लिहिली असती तर अमरने तिला काय उत्तर दिले असते. मुळात अमर-सखी हे फारच गूढ आहेत तरी मी वाचक म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे... त्यातून माझी वैचारिक आणि भावनिक वाढ होत आहे हे नक्कीच.
प्रिय सखी,
तुझे पत्र वाचून क्षणभर थबकलो. प्रत्येक ओळ मनाच्या खोल तळातून उमटलेली वाटली. त्या शब्दांमध्ये लाटांची गाज होती, आठवणींचा गंध होता, आणि एका हळव्या वेदनेची किनाऱ्याशी आदळणारी गाणी होती.
सखी, तुझ्या पहिल्या ओळीने मन हलवून टाकलं – "तुला गवसला का रे शेवटचा किनारा?"
खरं सांगू? किनारा गवसतो का कधी? आपल्यासारख्या लाटांसाठी किनाऱ्याचा शोध हा प्रवास आहे, गंतव्य नाही. आपण सतत वाहत राहायचं, ओढ सहन करत राहायचं, आणि कधी तरी एका शांत क्षणी किनाऱ्यावर विसावायचं. पण तू आहेस ना सोबत? मग किनारा दूर असला तरी काय फरक पडतो?
"तुझ्या ओठांवरती उमटला शांततेचा शहारा,
मी मात्र स्वरांच्या खोल तळात बुडते आहे…"
ही शांतता तुला दिसते, पण तिच्या आत कितीतरी शब्द दाटून बसले आहेत. काही मी कधीच बोलू शकलो नाही, काही तुझ्या प्रत्येक पत्रासोबत उमलत राहतात. तुझ्या स्वरात, तुझ्या संवादात, मी माझी हरवलेली गाणी शोधत राहतो.
"तू विरलेले धुके, मी दवबिंदू तुझ्या शोधात,
पहाटेच्या उन्हातही अलगद सांडते आहे…"
सखी, तुझी ओढ मी रोज अनुभवतो. तुझ्या आठवणींच्या हलक्या सावल्या कधी संध्याकाळच्या रंगांत विरघळतात, तर कधी एकाकी रात्री मला जागवत राहतात. पण मग वाटतं— धुकं विरतं, पण पूर्णपणे हरवत नाही. दवबिंदू जरी सांडले, तरी त्यांचा ओलावा मनात राहतोच, नाही का?
"मनाच्या किनाऱ्यावर तुझे शब्द तरंगले,
मी प्रत्येक लहरीत तुझा भाव शोधते आहे…"
मी इथल्या वाऱ्यांमध्ये तुझ्या शब्दांचा आवाज शोधतो. कधी एखाद्या शांत सायंकाळी वाटतं, आपण अजूनही एकत्रच आहोत—शब्दांत, आठवणींमध्ये, आणि त्या न बोललेल्या भावना जगण्यात.
"तुझ्या आठवांचा गंध दरवळतो अजूनही,
मी सावलीसारखी तुझ्यामागे झुरते आहे…"
माझ्यासाठी मात्र तुझ्या आठवणी हवेसारख्या आहेत— न दिसणाऱ्या, पण सतत जाणवणाऱ्या. कधी त्या अंगभर शहारा आणतात, कधी नकळत डोळे ओलसर करतात. पण सखी, सावलीसारखी झुरू नकोस… आपली मैत्री तुझ्या-माझ्या पलीकडची आहे. अंतराने थोडं दुरावलो असलो, तरी आपल्यातल्या या शब्दांनी, भावनांनी, आठवणींनी आपल्याला कायम जोडून ठेवलंय.
आणि म्हणूनच, मी तुला सांगतो—
किनारा मिळो न मिळो, लाटा नसतील तर समुद्र अपूर्ण असतो. आणि तुझ्यासारख्या लाटेशिवाय, माझ्यासारख्या किनाऱ्याचा काय उपयोग?
तुझाच,
अमर
निःशब्द केलेस दादा 🙏🙏
Deleteखूप छान
ReplyDelete*दूर दूर पसरलेला समुद्र हा, अवखळ सागरी किनारा..*
ReplyDelete*तुझ्या मनात दाटलेला एकांत हा सांगे जीवनाचा खेळ सारा....!*
मस्त शेर आहे नितीन!
DeleteGreat
ReplyDeleteखुप छान 😊
ReplyDeleteखुप सुंदर रचना
ReplyDeleteभटकणाऱ्या तुझ्या प्रतिभेचा सुगंध गझलेच्या लाटांवर दरवळत किनाऱ्यावर (आमच्यापर्यंत) पोहोचत आहे... अप्रतिम 😍
ReplyDeleteThanks Suchitra 😍
DeleteSwatach astitv kas nirman karun swatasathi kas jagav swatchi astitv nirman karnari mhanje tumhi sabdatun sabd guntun agdi premane lihlay
ReplyDeleteलाटाच काय त्या तर वाऱ्यासोबत येतात
ReplyDeleteकिनाऱ्याला न सांगता...पुन्हा निघून जातात
जाताना सुंदर शिंपले, रंगीत गोटे तिथेच किनाऱ्यावर राहतात आठवणी म्हणून
तरीही किनारा किती शांत सगळं पाहून..
म्हणूनच वाटतं कधीतरी बघावं किनारा बनून
कधी तरी बघावं किनारा बनून....!
Very nice
ReplyDelete