अजूनही भटकते आहे..(गझल)


अजूनही भटकते आहे..


तुला गवसला का रे शेवटचा किनारा?
मी लाटांसारखी अजूनही भटकते आहे…


तुझ्या ओठांवरती उमटला शांततेचा शहारा,
मी मात्र स्वरांच्या खोल तळात बुडते आहे…


तू विरलेले धुके, मी दवबिंदू तुझ्या शोधात,
पहाटेच्या उन्हातही अलगद सांडते आहे…


मनाच्या किनाऱ्यावर तुझे शब्द तरंगले,
मी प्रत्येक लहरीत तुझा भाव शोधते आहे…


तुझ्या आठवांचा गंध दरवळतो अजूनही,
मी सावलीसारखी तुझ्यामागे झुरते आहे…


तुला गवसला का रे शेवटचा किनारा?
मी लाटांसारखी अजूनही भटकते आहे…


          - तेजश्री शिंदे ✍️ 



Comments

  1. मोगरा ही तुला बेधुंद कराया अधिर आहे.
    सुगंध तर तुझ्या प्रत्येक शब्दात आहे

    ReplyDelete
    Replies
    1. या शब्द सुमनांसाठी धन्यवाद 🙏

      Delete
    2. खूप छान मॅडम 😘

      Delete
    3. अद्वितीय 💗

      Delete
  2. ❤️ खुप छान ❤️

    ReplyDelete
  3. छान शब्दरचना आहे

    ReplyDelete
  4. अप्रतिम 👍👍💞💞💞

    ReplyDelete
  5. Very beautiful as always👌

    ReplyDelete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. ❤️ अप्रतिम ❤️👏👏👏

    ReplyDelete
  8. खुप सुंदर

    ReplyDelete
  9. खूप छान

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  11. सौरभ मोडक2 March 2025 at 16:01

    तेजू नुकतेच तुझे "अमर आणि सखी"
    पत्र वाचले.... आणि आता ही गझल म्हणजे दुग्ध शर्करा योग! यातून सहज सुचले... जर ही गझल सखीने लिहिली असती तर अमरने तिला काय उत्तर दिले असते. मुळात अमर-सखी हे फारच गूढ आहेत तरी मी वाचक म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे... त्यातून माझी वैचारिक आणि भावनिक वाढ होत आहे हे नक्कीच.

    प्रिय सखी,

    तुझे पत्र वाचून क्षणभर थबकलो. प्रत्येक ओळ मनाच्या खोल तळातून उमटलेली वाटली. त्या शब्दांमध्ये लाटांची गाज होती, आठवणींचा गंध होता, आणि एका हळव्या वेदनेची किनाऱ्याशी आदळणारी गाणी होती.

    सखी, तुझ्या पहिल्या ओळीने मन हलवून टाकलं – "तुला गवसला का रे शेवटचा किनारा?"

    खरं सांगू? किनारा गवसतो का कधी? आपल्यासारख्या लाटांसाठी किनाऱ्याचा शोध हा प्रवास आहे, गंतव्य नाही. आपण सतत वाहत राहायचं, ओढ सहन करत राहायचं, आणि कधी तरी एका शांत क्षणी किनाऱ्यावर विसावायचं. पण तू आहेस ना सोबत? मग किनारा दूर असला तरी काय फरक पडतो?

    "तुझ्या ओठांवरती उमटला शांततेचा शहारा,
    मी मात्र स्वरांच्या खोल तळात बुडते आहे…"

    ही शांतता तुला दिसते, पण तिच्या आत कितीतरी शब्द दाटून बसले आहेत. काही मी कधीच बोलू शकलो नाही, काही तुझ्या प्रत्येक पत्रासोबत उमलत राहतात. तुझ्या स्वरात, तुझ्या संवादात, मी माझी हरवलेली गाणी शोधत राहतो.

    "तू विरलेले धुके, मी दवबिंदू तुझ्या शोधात,
    पहाटेच्या उन्हातही अलगद सांडते आहे…"

    सखी, तुझी ओढ मी रोज अनुभवतो. तुझ्या आठवणींच्या हलक्या सावल्या कधी संध्याकाळच्या रंगांत विरघळतात, तर कधी एकाकी रात्री मला जागवत राहतात. पण मग वाटतं— धुकं विरतं, पण पूर्णपणे हरवत नाही. दवबिंदू जरी सांडले, तरी त्यांचा ओलावा मनात राहतोच, नाही का?

    "मनाच्या किनाऱ्यावर तुझे शब्द तरंगले,
    मी प्रत्येक लहरीत तुझा भाव शोधते आहे…"

    मी इथल्या वाऱ्यांमध्ये तुझ्या शब्दांचा आवाज शोधतो. कधी एखाद्या शांत सायंकाळी वाटतं, आपण अजूनही एकत्रच आहोत—शब्दांत, आठवणींमध्ये, आणि त्या न बोललेल्या भावना जगण्यात.

    "तुझ्या आठवांचा गंध दरवळतो अजूनही,
    मी सावलीसारखी तुझ्यामागे झुरते आहे…"

    माझ्यासाठी मात्र तुझ्या आठवणी हवेसारख्या आहेत— न दिसणाऱ्या, पण सतत जाणवणाऱ्या. कधी त्या अंगभर शहारा आणतात, कधी नकळत डोळे ओलसर करतात. पण सखी, सावलीसारखी झुरू नकोस… आपली मैत्री तुझ्या-माझ्या पलीकडची आहे. अंतराने थोडं दुरावलो असलो, तरी आपल्यातल्या या शब्दांनी, भावनांनी, आठवणींनी आपल्याला कायम जोडून ठेवलंय.

    आणि म्हणूनच, मी तुला सांगतो—
    किनारा मिळो न मिळो, लाटा नसतील तर समुद्र अपूर्ण असतो. आणि तुझ्यासारख्या लाटेशिवाय, माझ्यासारख्या किनाऱ्याचा काय उपयोग?

    तुझाच,
    अमर

    ReplyDelete
    Replies
    1. निःशब्द केलेस दादा 🙏🙏

      Delete
  12. खूप छान

    ReplyDelete
  13. *दूर दूर पसरलेला समुद्र हा, अवखळ सागरी किनारा..*
    *तुझ्या मनात दाटलेला एकांत हा सांगे जीवनाचा खेळ सारा....!*

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त शेर आहे नितीन!

      Delete
  14. Bharatkumar LAD4 March 2025 at 22:05

    खुप सुंदर रचना

    ReplyDelete
  15. भटकणाऱ्या तुझ्या प्रतिभेचा सुगंध गझलेच्या लाटांवर दरवळत किनाऱ्यावर (आमच्यापर्यंत) पोहोचत आहे... अप्रतिम 😍

    ReplyDelete
  16. Swatach astitv kas nirman karun swatasathi kas jagav swatchi astitv nirman karnari mhanje tumhi sabdatun sabd guntun agdi premane lihlay

    ReplyDelete
  17. लाटाच काय त्या तर वाऱ्यासोबत येतात
    किनाऱ्याला न सांगता...पुन्हा निघून जातात
    जाताना सुंदर शिंपले, रंगीत गोटे तिथेच किनाऱ्यावर राहतात आठवणी म्हणून
    तरीही किनारा किती शांत सगळं पाहून..
    म्हणूनच वाटतं कधीतरी बघावं किनारा बनून
    कधी तरी बघावं किनारा बनून....!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

माणूस ओळखून ठार मारले गेले.