कविता..म्हणजे शब्दांना पडलेले पहाटेचे गोड स्वप्नरूप..!!

 



कविता 


माझ्या समोर आलेली सुंदर कथाच तू 

साधी सरळ सुरुवात करून 

उत्कंठा वाढवणारी... तितकीच श्रवणीय

वाचकाच्या मनावर हळुवार सुसंस्कार करत

त्याच्या मनाचा ठाव घेणारी..

घटना नि पात्रांच्या खेळात आपसूक आनंद देणारी 

माझी प्रिय कथा "तू"..!


छे..! कथेचा शेवट मात्र मला कधीच रुचला नाही 

आणि कथा एकाच केंद्राभोवती फिरत 

गाठत जाते शेवट तिच्या तिच्या परीनं..

तू मात्र अव्याहत.. नदीसारखा प्रवाही 

एका कथेत तुला करताच येणार नाही व्यक्त..!!


तुझा परीघ कादंबरीसारखा भासतो..

तिच्या कथात्मक कल्पनेचे जणू मूर्त रूपच तू 

थीमॅटिक विविधतेने नटलेली, अनोख्या शैलीत रंगलेली 

फ्लॅशबॅक किंवा प्रोलेप्सिस च्या कथनात ओपन एंड असलेली

माझी लोकप्रिय कादंबरी "तू "..!!


अरे..पण तीही अडकते निवेदकाच्या निवेदनात 

भूतकाळात रमत ती बनत रहाते दुसर्‍याचा आवाज 

तिला होताच येत नाही आत्मनिष्ठ..

ती अडकून पडते करार, काळ नि आवाजाच्या पैलूत 

तू मात्र रंगांची उधळण संगीताचा सुर..नि

शब्दांना पडलेले पहाटेचे गोड स्वप्नरूप..!! 


तू म्हणजे... ओवीतील छंद, गझलेतील मिसरा.. नि

मुक्तछंदातील गद्य पद्याचा सुरेल ताल..

जो कलात्मकतेने अभिव्यक्त होत..

सहज सुंदर भावनांनी...होत जातो व्यक्त

जो कितीही वाचला, अनुभवला, रिचवला

तरीही उरतोच थोडा..

तुझ्या माझ्या आयुष्यातील कवितेसारखा..!!


तुझ्या माझ्या आयुष्यातील कवितेसारखा..!


                                                   - तेजश्री शिंदे 


- तुमच्या आयुष्यात देखील अशीच सुंदर कथा, कादंबरी किंवा गोड स्वप्नरूप असलेल्या कवितेसारखी माणसे भेटली असतीलच..! त्यांच्या विषयी तुमच्या दोन ओळीतील प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल..!!
         




Comments

  1. एकदा एकदा का माणूस कवितेच्या प्रेमात पडला.. की मनाने हळवा अन् हृदयाने भावूक होवून जातो..!!

    आपल्या कविता देखील वरील पैकी आहेत.. ग्रेट 🤘

    ReplyDelete
  2. तेजश्री.. या नावातच कविता आहे.. तू नेहमीच पुस्तकांपेक्षा जास्त माणसांना वाचत आलीस... आज इतक्या वर्षांनी पुन्हा तुला प्रवाही बघून खूप आनंद होत आहे. अशाच कथा, कादंबरी, कविता तुझ्या हातून लिहून होवोत. Flow like a river.

    ReplyDelete
  3. Writing is a one-of-a-kind profession that takes hours of dedication to craft the imagination into such meaningful, interesting plus creative stuff to read.
    A Grate & meaningful poetry writen by madam 👌

    ReplyDelete
  4. Replies
    1. फारच छान, तुझ्या कविता वाचायला या पुढेही आवडेल.शुभेच्छा.

      Delete
    2. Thank you poonam... तुमच्या सारख्या वाचकांसाठी लिहायला आवडेल मला.

      Delete
  5. मॅडम.. आता तुमच्या कवितेची आतुरतेने वाट बघायला आवडेल.. कविता खूप छान लिहली..❤️

    ReplyDelete
  6. Madam khupach chaan

    ReplyDelete
  7. अग शब्दांची गोफण करून त्यांना शब्द बंधात गुंफने हि कला तुला छानच जमली आहे...नेहमी वाचायला आवडेल....

    ReplyDelete
  8. Wow , किती सुंदर कविता केली आहे... मी तर पुन्हा पुन्हा वाचली....🌼

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.