तो समोर येताच.. चुकतोच काळजाचा एक ठोका..!
चुकतोच काळजाचा एक ठोका
अनपेक्षित घडलेल्या क्षणांनी
जेव्हा घेतला जातो मनाचा ताबा
तेव्हा... पुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
मन आणि बुद्धीच्या दोलायमान परिस्थितीत
मन किंचित होते आतुर.. चिंतातूर
त्याच्या सोबत जगलेल्या क्षणांतून
जेव्हा आठवणी येतात उफाळून
तेव्हा... पुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
शब्दांच्या पलीकडे भावनांचा माजता कल्लोळ
मन किंचित जाते...शहारून..गहिवरून
त्याचे पहिले चुम्बन सहजच जाते स्मरून
जेव्हा स्पर्शांच्या आठवणी घेतात मनाचा ठाव
तेव्हा.. पुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
होणारी प्रत्येक भेट दिशाहीन भरकटणारी
कोणत्याही अपेक्षेनं न भारावलेली तरीही
त्याच्या मनातील स्पंदने ऐकू येतात सर्वार्थाने
आणि जेव्हा तो देतो आठवणींना उजाळा
तेव्हा.. पुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
स्पर्शाने फुलत गेलेले क्षण
जेव्हा अचानक येतात उचंबळून..
तेव्हा... पुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
पुन्हा तो समोर येताच..
चुकतोच काळजाचा एक ठोका..!

Kya baat hai madam... muze apki har poetry padhkar lgta hai ki ye muz par likhi gai hai.....iska matlab aap logon dil padhte ho...
ReplyDeleteवा मस्तच... सकाळची सुरुवात एका छान कवितेपासून तर झालीच. पण कोणाचा आठवणीतही झाली.😃❤️ Thank you Madam..
ReplyDeleteपुन्हा तो समोर येताच
चुकतोच काळजाचा एक ठोका..!
😄😄 Thanks Riya...!!
Deleteखुप छान आणि romantic 👌
ReplyDeleteThanks Santosh...romance is the base of poetry..!
ReplyDeleteKhup Sundar mam
ReplyDeleteThank you 😊
ReplyDeleteNice madam
ReplyDeleteThank you...!
ReplyDeleteप्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा अनुभव घेतलेलाच असतो.
ReplyDeleteतो किंवा ती समोर आल्यावर काळजाचा ठोका चुकतो…
आठवणीं हळुवार उलगडत जातात. प्रत्येक क्षण, प्रसंग समोर उभे राहतात.
भावनांचा कल्लोळ, मनाची घालमेल छान मांडलीय..
भावनांना शब्दात पकडून व्यक्त करणं हीच कवीची ताकद असते…
अगदी खरे आहे सुहास...प्रेम ही वैश्विक भावना आहे..त्यामुळे ही कविता सगळ्यांनाच भावते.
ReplyDelete