अबोल... न बोलताच सर्व काही बोलून जाणारी..!

 



                 अबोल 


तू समोर आलास तरी डोळे तुला पाहणार नाहीत..

पण तुला पाहिल्याशिवाय मला रहावणार नाही.


तू समोर बसशील नि

विषयाला सुरुवात करशील..

शब्दांनी घिरट्या घालत हृदयात हात घालशील.


तुझे मला पहाणे नि माझे तुला न्याहाळणे.. 

माझी नजर चुकवून पुन्हा पुन्हा मलाच पहात रहाणे.


आंतरिक ओढ ही सहजरीत्या वाढत गेली..

तुझ्या एका स्पर्शाची हुरहूर मनी ऊब देऊन गेली.


चाहूल माझी लागताच डोळे तुझे लुकलुकले..

शब्दांच्या पलीकडले भाव मनी दरवळले.


श्वास रोखून श्वासांमध्ये स्पर्श हळुवार पुटपुटले..

शब्दांनीच मिठीत घेऊन अबोल क्षण गोंजारले.


अव्याहत प्रवास हा खूप काही देवून जातो..

अमृतसुखाची ओंजळ अनुभूतीने भरून नेतो.


तुझ्या माझ्या नात्याला मखमली सुगंध दरवळतो..

 खोल खोल गर्तेतून प्रेमभाव तरंगतो..


खोल खोल गर्तेतून प्रेमभाव तरंगतो..!


                                                        - तेजश्री शिंदे 




Comments

  1. वाह .....❤️ अप्रतीम ♥️

    ReplyDelete
  2. तू समोर आलास तरी डोळे तुला पाहणार नाहीत..
    पण तुला पाहिल्याशिवाय मला रहावणार नाही.💘

    तुझे मला पहाणे नि माझे तुला न्याहाळणे..
    माझी नजर चुकवून पुन्हा पुन्हा मलाच पहात रहाणे.😍
    मॅडम तुमच्या कविता खूप छान असतात. 👌 काही ओळी ह्या माझ्यासाठीच लिहल्या गेल्या आहेत.😃❤️

    ReplyDelete
    Replies
    1. माझी कविता ही तुला आपली वाटली यातच त्या कवितेचे सामर्थ्य दडलेले आहे.....कविता ही ज्याला जशी वाटेल, भावेल त्याने तशी घ्यावी.

      Delete
  3. वाह...क्या बात है...!

    ReplyDelete
  4. प्रेमभाव कसा असतो, मनाच्या लहरी कशा असतात ते सांगणारी आणखी एक सुंदर कविता... एरवी कविता लिहिली जाते पण ही कविता सहजसुंदर आणि फुलत जाणारी वाटते.. मनाचा ठाव घेत वाचणाऱ्याला आठवणींच्या हिंदोळ्यावर नेते..👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरे आहे..सुहास! ही कविता सहज सुंदर खुलत जाते.

      Delete
  5. मैत्रीण मिळणं अवघड नाही, तर आपली प्रेमाने काळजी करणारी सखी मिळणं अवघड असत....

    ReplyDelete
    Replies
    1. तेव्हाच अबोल बोलू लागेल...!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.