मी आता उरलेच कोठे..!


(Picture credit: Adhrit)



मी आता उरलेच कोठे 


संभावनांच्या पलीकडे संभ्रमाचे राज्य आहे.

घातले थैमान त्यांनी, जे इथे हैराण आहे.


माजले काहूर मनी की भावनांचा खेळ आहे.

तू इथे समोर माझ्या, चंद्राचा तो भास आहे.


पावसाच्या सरींमध्ये शब्द माझे मुके आहे.

दाटल्या धुक्यात माझ्या अश्रूंचे दवसार आहे.


वेचलेल्या मधुर क्षणांचे चांदणे तुझेच आहे.

ओंजळीतले ते निखारे, तुझ्या स्मृतींची राख आहे.


परतुनी आलास जवळी, मी आता उरलेच कोठे 

गोठलेल्या त्या क्षणांतून तू कधीच सुटला आहे.


गोठलेल्या त्या क्षणांतून तू कधीच सुटला आहे.


                                                       - तेजश्री शिंदे 



Comments

  1. खूपच छान मॅडम... "मी आता उरलेच कोठे "
    आणि शेवटचा ओळी अप्रतिम...❤️
    परतुनी आलास जवळी, मी आता उरलेच कोठे
    गोठलेल्या त्या क्षणांतून तू कधीच सुटला आहे.💯✨
    तूम्ही खूप सुंदर कविता केली. आजून एक कविता पोस्ट करा.❤️

    ReplyDelete
  2. Thank you Riya..! कविता हा form लिखाणासाठी मला जास्त comfortable वाटतो. आपण आपले विचार, भावना अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकतो... तुमच्या सारखे वाचक असतील तर लिखाण आजून बहारदार होत जाईल.

    ReplyDelete
  3. परतुनी आलास जवळी,मी आता उरलेच कोठे.....जणू काय पौर्णिमेचा चंद्रमाच तो असा भासत आहे ....खूप सुंदर कविता ताई.....खूप सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. वाह... पौर्णिमेचा चंद्र जसा एक दिवसाचे पूर्णत्व देऊन जातो.. अशी अनेक भेटणारी माणसे आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करत असतात. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

      Delete
  4. मनाची अस्वस्थता आणि हतबलता या कवितेतुन व्यक्त होतेय. शेवटची ओळ तर हृदयाला भिडणारी आहे...'गोठलेल्या त्या क्षणातून तू कधीच निसटला आहे'

    तो जाऊ नये ही अनिवार इच्छा होती. तो आला पण उशीर झाला..कारण ती आता उरली नव्हती..आणि त्या मंतरलेल्या क्षणांतून तो निघून गेला होता... कधीच.
    ही अगतिकता, हतबलता नेमक्या शब्दात वर्णन केली आहे.

    ही कविता खूप खोल आणि गहिरे अर्थ असणारी आहे..

    ReplyDelete
  5. सुहास... चांगली कविता समजून घेणारा वाचक मिळणे हे लेखकाचे भाग्य आहे. माझ्या कविता आपल्याला कशा वाटतात या तुम्ही नेहमीच तुमच्या शब्दशैलीत कळवत असता...असेच आपले अभिप्राय देत रहा.. धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.