सखी'चे पत्र...(पहिले)
पत्र (पहिले)
प्रिय अमर,
तू इथून गेल्यापासून आज पहिल्यांदाच तुला पत्र लिहीत आहे. आपल्या वयाच्या पलीकडे जात... तू विचारांनी फार प्रगल्भ होत गेलास... तू गेल्यापासून तुझी उणीव सतत भासत रहाते... माझी बडबड ऐकणारा आणि उगीच तात्विक चर्चा करत बसण्यापेक्षा मुद्द्याला हात घालणारा माझा सवंगडी माझ्यापासून खूप दूर निघून गेला...तरीही... तू सोबत असल्याची जाणीव मात्र चिरायु आहे... बर का !
याचे कारण असे की आपल्यातील बंध हे कालातीत नव्हतेच कधी..! तू समोर बसावं अन् तासनतास बोलत रहावं असं कधीच आपल्यात घडले नाही....पण भेटल्यावर मात्र आपण इतिहासातील दोन जबरदस्त पात्र आहोत आणि घटना या आपल्या अवतीभवती घडतच आहेत याचा सदृश भास मला नेहेमीच होत असे.
आज मुंबईत बरीच थंडी पडली आहे. मागचा थंडीचा मोसम तू असाच विचारचक्रात गमावून बसलास...मुळात तुला नक्की काय म्हणायचे होते हे अगदी शेवटपर्यंत तू बोललाच नाही. माणसाने व्यक्त होत रहावं बघ.. आणि व्यक्त होने म्हणजे तरी काय रे... अक्षरांचा आधार घेत शब्दांची माळ गुंफत वाक्यातून रिते होत जाणे.. तुला हेही जमलेच नाही सोड...पण तरीही संवाद होत होताच...!
बाई म्हणून माझ्या वागण्या बोलण्याला अर्थ लावणार्यांना मी कधी कळलीच नाही... आणि कोणी मला समजून घ्यावे असा अट्टाहास देखील मी धरला नाही.. अगदी तुझ्या बाबतीत देखील..! आणि कशाला हवा रे नसता आक्रस्ताळेपणा..! दोन व्यक्तींना एकमेकांशी कसे वागायचे हे सर्वस्वी त्यांनीच ठरवायला हवे नाही का..? त्यांच्यातील नियम, परिस्थिती आणि एकमेकांशी बोलायच्या गोष्टी या सगळ्या वेगळ्याच. त्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्याबाबत त्यांचे स्वातंत्र्य घ्यावे.
स्त्री पुरुष संबंधाबाबत आपला समाज फारच उदासीन आहे... वर्षानुवर्षे चालत आलेल्या नियम अटींच्या पलीकडे तो जाऊच देत नाही....तरी जो तो आपले स्वातंत्र्य आपआपल्या परीने घेतच आहे की..! उगाच गोष्टी चौकटीत बांधून नैसर्गिक भावनांचा लोक फार छळ करतात बघ.
सध्या काय वाचतोयस...तू सांगितलेले खालिद हुसैन यांचे "A thousand splendid suns" आजुन वाचून पूर्ण झाले नाही.. it's take time to soak in ... असे तू बोलला होतास आणि ते खरे ही आहे... मरियम आणि लैला यांच्या आजूबाजूला ही कादंबरी घडत जाते...आणि त्यातील संवाद वाचकाला उच्चकोटीची अनुभूति देऊन जाते....“A woman who will be like a rock in a riverbed, enduring without complaint, her grace not sullied but shaped by the turbulence that washes over her.” या ओळींमध्ये तो स्त्री विषयी किती मोठे भाष्य करत आहे.
माझ्या कवितांचा छंद तुझ्या जाण्याने थोडासा ओसरला असला तरी... Basho म्हणतो तसं..." Real poetry is to lead a beautiful life. To live poetry is better than to write it.... अस काहीसं झालं आहे.
विषय बरेच आहेत...पुन्हा कधीतरी पत्र लिहून भरपूर गप्पा मारू.... एका अर्थी आपण सगळे प्रवासीच आहोत बघ... त्यामूळे भेटणारी माणसे त्यांची वळणे आली की वळणारच ना..! उगीच त्याचा भार घेण्यापेक्षा आपण आयुष्य भरभरून जगले पाहिजे... नाही का? चल उगाच तुला कोड्यात पाडत बसत आहे. आज इथेच थांबते.

Super super super...!
ReplyDeleteभावना व्यक्त करण्याचा हा प्रकार खूप उत्तम आहे. पत्र असा प्रकार आहे तो न पाठवता, समोरच्याने न वाचताही त्याच्या पर्यंत आपल्या भावना पोहीचल्याचे समाधान मिळतं.
काल्पनिक असले तरी या पत्राद्वारे तुमचे मन आणि अंतरंग समजणार आहेत. ही पत्रमालिका वाचायला खूप आवडेल.
मलाही लिहिताना असाच अनुभव आला...! ही पत्र मालिका लिहायला मलाही आनंद मिळत आहे.. जो खूपच निखळ आहे.
ReplyDelete👍
Deleteफार आवडलं मला हे. लिहित रहा पुढेही
ReplyDeleteThanks Geetesh...!
ReplyDeleteSo nice
ReplyDeleteThank you.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteThank you.
ReplyDeleteप्रेमात.......❤️ तुमचं पत्र च जणू अमर आहे असं जाणवतय.... आणि हा पत्रांचा प्रवास निरंतर सुरू ठेवा!💌
ReplyDeleteWaah...Harsha...!! तुझी ही प्रतिक्रिया देखील तितकीच सुंदर आहे...😊
Deleteखुप छान
ReplyDeleteअप्रतिम
काही लोक बोलतात की प्रेम केल्यावर त्रास होतो.. पण प्रेम केल्याशिवाय प्रेमाच्या गोष्टी बोलत नाही....
ReplyDeleteप्रेम ही नकळत जडणारी भावना आहे... ठरवून असं काहीच होत नाही.
Deleteखूपच छान
ReplyDeleteThank you 😊
Delete