राधा.. स्त्रीत्वाचे स्वातंत्र्य आपल्या जीवनगाथेत सांगणारी लाघवी प्रेयसी!
राधा
राधा... जिने मला नेहमीच घातली भुरळ
संस्कृतीच्या कोणत्याच चौकटीत न बसता..
ती होत राहिली व्यक्त आपल्याच भाव भावनांसह..!
राधा.. जिच्यासाठी कृष्ण होता नेहमीच सखा
तिने कधीच केला नाही अट्टाहास त्याच्या जीवन संगिनीचा
तिच्या अद्वितीय प्रेमाने अन् निस्सीम भक्तीने
ती होत राहिली अजरामर कृष्ण प्रेयसी..सखी..राधा..!
राधा.. जिने बदलून टाकल्या सामाजिक संकल्पना
स्त्री पुरुष संबंधांतील वास्तविक अर्थभेद
कल्पनाविलासीत वास्तवातील ती मूर्तिमंत स्वरुप
आपल्याच प्रियकराची आध्यात्मिक भक्त..राधा..!
राधा.. म्हणजे समर्पण
राधा.. म्हणजे अलौकिक प्रेमगाथा
राधा.. म्हणजे अद्वैत
राधा.. म्हणजे ती, मी आणि सगळ्याजणीं
ज्या होत जातो व्यक्त राधेच्या वाटेने..
प्रेममय भक्तिरस.. नि कृष्णाच्या बासरीचा सूर..म्हणजे राधा..!
राधा...म्हणजे राधाच..!

राधा म्हणजे समर्पण, अलौकिक प्रेमगाथा आणि अद्वैत...अगदी सहज सोप्या पद्धतीने राधाचे अंतरंग उलगडवून दाखवणारी कविता
ReplyDeleteThanks, Suhas!
ReplyDelete