घालमेल.. (कविता)

 घालमेल..


सर पावसाची उभी 

मना देईना गारवा 

कुठे हरवला माझ्या 

अंतरीचा तो बरवा..


अशी गाली उमटली 

लाज गुलाबी मारवा

तुझ्या आठवांचा ऋतू 

खुले बहर हिरवा..


उगा व्याकुळ होऊनी

साद घालतो पारवा 

कसा पाझर फुटेना 

मन झुरते राघवा..


प्रेम जहरी जहरी 

काटा काळजा रुतावा 

कुठे शोधता उतारा 

जन्म मायेचा चकवा.. 


                                          - तेजश्री शिंदे ✍️




Comments

  1. Waah.... apratim shabd Rachana!

    ReplyDelete
  2. Absolutely amazing.... Great.

    ReplyDelete
  3. Soo beautiful ❤️❤️

    ReplyDelete
  4. Chan ahe shabdh rachana

    ReplyDelete
  5. काय सुंदर लिहिले आहेस तेजू...
    अशी गाली उमटली
    लाज गुलाबी मारवा
    मारवा चक्क कानात घुमू लागला बघ.. तुझी कविता शब्द संगीताची मेजवानीच आहे. जितकी अचूक शब्दांची निवड तितकेच तरल भावना पेरत तुझी कविता काळजाचा ठाव घेते...!

    ReplyDelete
  6. वाह... अप्रतिम शब्द संपदा.... प्रेम... विरह रसपूर्ण!

    ReplyDelete
  7. Beautifully written 👏 ❤️

    ReplyDelete
  8. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  9. खूप सुंदर ओळी तेजू.. निसर्गाच्या विविध रंगांनी रेखाटलेले अन्‌ त्याला भावनिक छटांनी सजवलेले चित्रीकरणच जणू! अन्‌ पाऊस गेल्यावर सुचलेल्या ह्या ओळी म्हणजे निव्वळ योगायोग नव्हे!

    चिंब पावसात मन
    नखशिखांत भिजलेलं
    सर सरता मात्र
    सुरू होई घालमेल!

    हा पाऊसच माझ्या
    प्रीतीचे प्रतिबिंब
    जाता क्षणीच मन
    आसवांनी ओलेचिंब!

    बर्‍याच दिवसांनी तुझी कविता वाचनात आली.. बरं वाटलं.. अशीच लिहीत रहा अन्‌ व्यक्त होत रहा.. 👌🌹🤝

    ReplyDelete
    Replies
    1. कवितेला जेव्हा कविताच अभिप्राय म्हणुन मिळते त्यापुढे काहीही बोलणे व्यर्थ आहे...! मनापासून धन्यवाद मंगेश 😊🙏

      Delete
  10. अप्रतिम,...💐🙏

    आठवांचे आभाळ,
    मनात काहुर करतंय.
    सैरावैर झाले वादळ,
    शांत होण्या तरसंतय.....
    श्री.ज्ञानेश्वर जाधव

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम ज्ञानेश्वर... अतिशय समर्पक चारोळी 😊😊

      Delete
  11. Khoopch sunder teju..👍👏👏

    ReplyDelete
  12. अप्रतिम मस्त आहे कविता

    सर पावसाची उभी
    मना देईना गारवा
    कुठे हरवला माझ्या
    अंतरीचा तो बरवा

    ReplyDelete
  13. खुप छान ❤️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

गझल: रक्तबंबाळ चांदणे

कळून आले (कविता)