आठवणींचा दडलेला एक कप्पा म्हणजे...जुनं पुस्तक 📖

 

जुनं पुस्तक 


धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं 

आज डोकं वर काढलं अन्          

इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर          

पुन्हा हातात येवून विसावलं..!     

  

पहिल्याच पानावर तुझी अक्षर      

त्यात रेंगाळत राहिली माझी बोटं   

शोधत तुझा पहिला परिस स्पर्श    

पुन्हा फुलून आलं अंग-अंग..!      


पहिल्या प्रेमाची कथा अन्        

कोवळ्या मनांच्या व्यथा सांगत    

पुस्तकाच्या पानांत दडलेलं          

गुलाबाचं फुल पुन्हा दरवळंल..!   


धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं 

आज डोकं वर काढलं..            

                                         - तेजश्री शिंदे   

Comments

  1. अतिशय सुंदर लिहिता तुम्ही.असेच लिहित राहा व पुस्तक प्रकाशित करा.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच...अप्रतिम

    ReplyDelete
  3. Very well captured feelings of the past captured in words... Congratulations 🎉

    ReplyDelete
  4. अप्रतीम

    ReplyDelete
  5. Khup chan mam..... ❤️👍🏻👌🏻

    ReplyDelete
  6. Sheetal Kakade - One of your fan!30 November 2023 at 13:17

    Sundar Madam!! Tumchya kavita agdi tumchya sarkhya sundar aahet.
    Haravalelya jagat gheun gelat tumhi and kahi junya aathavanina ujala dilat.
    Your poem is like a love story hidden within the pages of time, it makes you feel nostalgic and evokes a sense of longing and remembrance.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your heartfelt words. I'm glad the poem could evoke those emotions and create a connection through the pages of time. Your response means a lot to me.😊😊





      Delete
  7. खूप सुंदर ओळी तेजू!!.. आठवणींचा साठा असाच जतन करता यावा!. अन्‌ त्यात पहिल्या प्रेमाची आठवण! खरं तर पहिलं प्रेम हेच शेवटचं खरं प्रेम असतं! नितळ, कोमल, सुंदर अन्‌ निःस्वार्थी!

    म्हणूनच तर...

    सरले दिस झाल्या आठवणी धूसर
    तरी तो अगदी जवळ आहे

    म्हणुनच तर..

    सुकलेल्या गुलाबात अजुनही
    त्याच प्रीतीची दरवळ आहे!
    त्याच प्रीतीची दरवळ आहे!!

    अशीच लिहीत रहा अन्‌ स्वच्छंदपणे व्यक्त होत रहा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मंगेश! दोन दिवसांपासून घरातील जुनी पुस्तके काढून बसले होते...त्यातली काही ऑफिस मध्ये आणून वाचत बसले आणि सहज सुचत गेले... जुनं पुस्तक!😊😊

      Delete
  8. Nehmi pramane apratim...janu pustakach bolat ahe tyache bhaav❤️❤️❤️

    ReplyDelete
  9. वा ss 👌👌
    लेखन आणि वचन दोन्हीही
    खूप छान 👍🏻 अश्याच पुढच्या लेखाना साठी शुभेच्छा 💐

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.