आठवणींचा दडलेला एक कप्पा म्हणजे...जुनं पुस्तक 📖
जुनं पुस्तक
धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं
आज डोकं वर काढलं अन्
इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर
पुन्हा हातात येवून विसावलं..!
पहिल्याच पानावर तुझी अक्षर
त्यात रेंगाळत राहिली माझी बोटं
शोधत तुझा पहिला परिस स्पर्श
पुन्हा फुलून आलं अंग-अंग..!
पहिल्या प्रेमाची कथा अन्
कोवळ्या मनांच्या व्यथा सांगत
पुस्तकाच्या पानांत दडलेलं
गुलाबाचं फुल पुन्हा दरवळंल..!
धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं
आज डोकं वर काढलं..

अतिशय सुंदर लिहिता तुम्ही.असेच लिहित राहा व पुस्तक प्रकाशित करा.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteनेहमीप्रमाणेच...अप्रतिम
ReplyDeleteVery well captured feelings of the past captured in words... Congratulations 🎉
ReplyDeleteअप्रतीम
ReplyDeleteKhup chan mam..... ❤️👍🏻👌🏻
ReplyDeleteSundar Madam!! Tumchya kavita agdi tumchya sarkhya sundar aahet.
ReplyDeleteHaravalelya jagat gheun gelat tumhi and kahi junya aathavanina ujala dilat.
Your poem is like a love story hidden within the pages of time, it makes you feel nostalgic and evokes a sense of longing and remembrance.
Thank you for your heartfelt words. I'm glad the poem could evoke those emotions and create a connection through the pages of time. Your response means a lot to me.😊😊
Deleteखूप सुंदर ओळी तेजू!!.. आठवणींचा साठा असाच जतन करता यावा!. अन् त्यात पहिल्या प्रेमाची आठवण! खरं तर पहिलं प्रेम हेच शेवटचं खरं प्रेम असतं! नितळ, कोमल, सुंदर अन् निःस्वार्थी!
ReplyDeleteम्हणूनच तर...
सरले दिस झाल्या आठवणी धूसर
तरी तो अगदी जवळ आहे
म्हणुनच तर..
सुकलेल्या गुलाबात अजुनही
त्याच प्रीतीची दरवळ आहे!
त्याच प्रीतीची दरवळ आहे!!
अशीच लिहीत रहा अन् स्वच्छंदपणे व्यक्त होत रहा!
धन्यवाद मंगेश! दोन दिवसांपासून घरातील जुनी पुस्तके काढून बसले होते...त्यातली काही ऑफिस मध्ये आणून वाचत बसले आणि सहज सुचत गेले... जुनं पुस्तक!😊😊
Deleteसुपर
ReplyDeleteNehmi pramane apratim...janu pustakach bolat ahe tyache bhaav❤️❤️❤️
ReplyDeleteThank you Varsha 😊
DeleteVery nice!!
ReplyDeleteवा ss 👌👌
ReplyDeleteलेखन आणि वचन दोन्हीही
खूप छान 👍🏻 अश्याच पुढच्या लेखाना साठी शुभेच्छा 💐
मनापासून धन्यवाद 🙏
Delete