पाऊस.. सर्वार्थाने कोसळणारा!

पाऊस 


पावसाची कविता की, 

कवितांचा पाऊस 

बेभान मनाचा उसळता, 

आठवणींचा पाऊस..


कडाडत्या विजांचा, 

शब्द वेदनेचा पाऊस 

गहिवरल्या भावनांचा, 

चिंब भिजलेला पाऊस..


कोंडलेल्या मनाचा, 

ओल्या जखमांचा पाऊस 

अवकाळी कोसळणारा, 

शब्दगारांचा पाऊस..


आभाळ भरून आलेला 

नेत्र धारांचा पाऊस

प्रेयसीला साद घालणारा,

व्याकुळ मनाचा पाऊस..


सैरभैर विचारांचा,

गोंधळलेला पाऊस 

मृदगंधातून अंकुरित होणारा,

सृजन सोहळ्याचा पाऊस..!


                                           - तेजश्री शिंदे 





Comments

  1. 1 ch number...kiti artha ahe ya pausat....
    Ka nahi paus aavdava ..
    Mast mam

    ReplyDelete
  2. Very nice Kavita, मनातील भावनांचा कोसळणारा पाऊस पडतो

    ReplyDelete
  3. कोसळणाऱ्या पावसातून मनाचा भावनांचा उद्रेक झालेला आहे, अतिशय सुंदर अशा विचारांच्या भावनांच्या साखळीचा बोध निर्माण होतो, मनात दडपून ठेवलेल्या भावनेचा या कवितेतून उद्रेक झालेला आहे

    ReplyDelete
  4. सुरेख , खूप छान कविता. प्रत्येक कडव वाचताना त्या कडव्यात शब्दबद्ध झालेला पाऊस नजरेस येत होता. किती विविध प्रकारचा पाऊस असू शकतो हे या कवितेत दिसून आले. या प्रत्येक पावसात प्रत्येक माणूस कधी ना कधी एकदा नक्की भिजलेला असतो. सहज सोपे शब्द पण प्रत्येक शब्दाची जागा अचूक आहे आणि जसजसे एक एक कडवे वाचत जातो त्यात आपण हरवून जातो आणि मनातून चिंब भिजण्याचा पुरेपूर आनंद घेतो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सौरभदा 😊

      Delete
  5. Khup sunder Teju

    ReplyDelete
  6. पाऊसाची कविता, खूप छान teju,

    पाऊस आणि त्याचे सगळे प्रकार, यांची आणि मानवी भावना आणि विचार यांची सांगड अगदी छान प्रकारे घातली आहेस. पावसाची स्थिती आणि आणि त्याला जुळणारी अनुकूल अशी मनस्थिती यांना जोडून सुंदर लिखाण केले आहेस. वाचताना सुद्धा त्या दोन्हींचा म्हणजे पावसाची स्थिती आणि आपली मनस्थिती यांचा चलचित्र मनात आपसूकच तयार होतो. पुन्हा तेच अगदी सरळ सोपी वाटणारी आर्त मर्म दडलेली कविता. जितका वेळ घेतला असेल या कवितेने तुझा तो सार्थकी लागला असे समज.. खूप छान teju..

    ReplyDelete
    Replies
    1. अनेक धन्यवाद अझहर! पावसाने आपल्या सगळ्यांच्याच आठवणींचा कप्पा ओतप्रोत भरलेला आहे. पाऊस हा आपण वेगवेगळ्या प्रकारे अनुभवला आहे.. त्या सर्व अनुभवांचा सार म्हणजे ही कविता.

      Delete
  7. खूप छान जमली आहे कविता. आमच्या मनात क्षणभर का होईना भावनांचा पाऊस पडला आणि मनाला गारवा मिळाला. आमच्या मनाला असाच शब्दांचा गारवा आपल्या कविता मार्फत मिळत राहो हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  8. कवितेतील शब्द खऱ्या अर्थानं मनाला भिजवून गेले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.