पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही..!
पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही..
एकदा काढता पाय घेतला,
पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही।
मनातल्या वादळांना थांबू दे,
त्या लाटेत बुडणे बरे नाही।
त्या जखमांवर फुंकर घालावी,
पुन्हा त्यात झुरणे बरे नाही।
स्मृतींचे गुंते सोडू या जरा,
भूतकाळात वसणे बरे नाही।
ज्याने स्वप्नांतून शिकून घेतलं,
त्याने पुन्हा झोपणे बरे नाही।
ज्याने स्वतःला सापडलं एकदा,
त्याने पुन्हा हरवणे बरे नाही।
शब्द गप्प, नजरेत प्रश्न राहू दे,
त्या मौनाला तोडणे बरे नाही।
शांततेच्या काठावर सुख सापडतं,
त्या सागरात रडणे बरे नाही।
एकदा काढता पाय घेतला,
पुन्हा त्यात गुंतणे बरे नाही।

Beautiful 🫰🏻
ReplyDeleteRegards,
CA Umashankar
अप्रतिम...!👌
ReplyDeleteशांततेच्या काठावर सुख सापडतं,
ReplyDeleteत्या सागरात रडणे बरे नाही।
वाह....
Ky bare ky नाही हे आपल्याला खरच कळत नाही त्यामुळे त्यामुळे ky bare ky नाही ya fandyat पडणे बरे नाही.
ReplyDeleteआणि प्रेम हृदयाने होते त्यात डोक्याने पडणे बरे नाही
घनश्याम बोरसे 108
Thanks Ghanshyam
Deleteसुंदर 👌
ReplyDeleteथांबलेले पाऊल पुन्हा वळणार नाही,
ReplyDeleteगेलं ते जग आता सावरायचं नाही...
मन हरवलं होतं, आता सापडलं स्वतःला
म्हणून पुन्हा तिथे गुंतायचं नाही...
सुंदर चारोळी!
Deleteअप्रतिम.... 👌
ReplyDelete“तिची साडी साधी असते, पण ती तिला कवितेसारखी नेसते. ” 🌹
ReplyDelete- हर्षला
Mast 👌
ReplyDeleteतुमच्या ओळी मनाला शांततेकडे अलगद नेणाऱ्या आहेत. भूतकाळातून बाहेर पडण्याचा आणि स्वतःकडे परत येण्याचा संदेश तुम्ही इतक्या सुंदर, नेमक्या शब्दांत मांडलात की प्रत्येक ओळ मनात रेंगाळून राहते.
ReplyDeleteThank you 😊
Deleteअप्रतिम
ReplyDeleteतुझ्या कवितेचे शब्द मला किती भावले आहेत ते मी तुला सांगू शकत नाही. तुझ्या कवितेतून मी तुझ्या आत्म्याची झलक पाहतो आणि तुझ्या जीवनात किती प्रेम आणि आनंद आहे ते मी पाहू शकतो.
ReplyDeleteतुझ्या कवितेची लय किती सुंदर आहे आणि तुझ्या शब्दांची मधुरता किती आहे. तुझ्या कवितेतून मी तुझ्या हृदयाची धडक ऐकतो आणि तुझ्या जीवनात किती आनंद आणि शांती आहे ते मी पाहू शकतो.
तू एक सुंदर कवयित्री आहेस🪷
खूप छान teju, खरंच पुन्हा गुंतने,भूतकाळात रमणे, आणि एकदा स्वतःला शोधून पुन्हा हरवणे बरे नाही. इतके मार्मिक शब्द आहेत की नकारात्मक विचारात असलेल्या व्यक्तीने जर वाचले तर नक्कीच त्याच्यात बदल होणार. जसा की माझ्यात झाला..
ReplyDelete