भूमिका (कविता)
आजकाल मी कोणतीही भूमिका घेत नाही.
कारण प्रत्येक भूमिका एक ओळख मागते,
आणि आता माझ्याकडे
ओळखी उरलेल्या नाहीत.
कधीकाळी मी "मी" होते..
गाभाऱ्यात उभ्या मूर्तीइतकी स्थिर,
पण बाहेर चाललेल्या नाट्यगृहात
ती मूर्तीही एक पात्रच ठरली…
पाहता पाहता लक्षात आलं..
स्वतःचं अस्तित्व ही सुद्धा एक कल्पना होती,
जशी वेळ ही केवळ घड्याळात दिसते,
आणि "निर्णय" हे केवळ
पूर्वसंस्कारांचं रांगणारं सावट.
निर्णय माझे नव्हते,
ते माझ्या श्वासांतून फक्त वाहिले.
जणू एखाद्या पानावरून वारा वाहतो
पण पान कधीच वाऱ्याचा स्रोत नसतो…
आज मी निवडते
निवड न करण्याचं स्वातंत्र्य.
साक्ष होणं हीच माझी नवी भूमिका
जिथे मी पात्र नाही,
तर
"दृश्य" आणि "द्रष्टा" यांच्यात
पडलेला निवांत विराम आहे.
मी कोण आहे?
हा प्रश्नही आता थकला आहे.
तोही आता प्रश्न नाही उरलेला..
फक्त एक शांतता आहे
जिच्यात सर्व प्रश्न विलीन होतात.
उरते फक्त एक अस्तित्व..
अदृश्य, अलिप्त,
ना ‘मी’, ना ‘माझं’,
फक्त असणं...
एक निर्विकार साक्ष.

👍
ReplyDeleteKhup sunder👍
DeleteWow mam
ReplyDeleteKhupach mast kavita ahe 😍
तत्त्वज्ञानाच्या गहिर्यात डोकावणारी ही कविता,
ReplyDelete‘मी’च्या अस्तित्वाचा शोध घेत
शब्दाशब्दांतून अद्वैत उलगडते,
आणि शेवटी सगळं ‘फक्त असणं’ या शांततेत विलीन होतं.
Thank you 😊
DeleteThis isn’t just a poem,
ReplyDeleteit’s a silent dialogue with the soul.
Where the 'I' disappears into awareness,
and only pure witnessing remains.
Thank you 😊
Deleteआपण आपलं अस्तित्वच विसरून जातो त्या अस्तित्वाला जागृत करून त्याच्यावरती हळुवारपणे फुंकर घालणारी व मनाला परत एकदा नवचैतन्य देऊन जाणारी अशी ही आपली कविता आहे. जीवनाचा सार हे फक्त आपल्या अस्तित्वा भोवतीच गिरक्या घालत असतं
ReplyDeleteThank you sir 🙏
DeleteSwatch astitv kas vel barobar badalt hey aaplyala kale nas hoto pn hya kavitetun aaplyala navin shurwaat karavi hey sikavl🙂
ReplyDeleteThanks Khushi 😊
DeleteVery nicely articulated self dailogues!
ReplyDeleteLovely thought on indentity 💞💞💞💞👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 superb ❤️💕💖💞
ReplyDeleteThanks Maam 😊
Deleteआजकाल मी कोणतीही भूमिका घेत नाही.
ReplyDeleteकारण प्रत्येक भूमिका एक ओळख मागते,
आणि आता माझ्याकडे
ओळखी उरलेल्या नाहीत.
*काय ओळी आहेत अप्रतिम*
कधीकाळी मी "मी" होते..
गाभाऱ्यात उभ्या मूर्तीइतकी स्थिर,
पण बाहेर चाललेल्या नाट्यगृहात
ती मूर्तीही एक पात्रच ठरली
*लाजवाब ओळी आहेत*
तेजा काय लिहिते यार तू.
कस सुचत तुला ?
इतक्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या तुझ्या दिनचर्येत इतकी अप्रतिम शब्दरचना आणि तेवढा विचार करण्यासाठीचा वेळ कसा काढतेस त्या पांडुरंगाला माहिती फक्त.
पण तुझ्या लिखाणाच्या प्रेमात पडावं असे वाटते.
केवळ अप्रतिम लाजवाब ब्युटीफूल ❤️❤️❤️
Khup chan
ReplyDelete