तुला सोडून जाताना..( कवीता)
करार नव्हताच आपल्यात तसा एकत्र येताना
मग दुरावाही का भासावा, हात निसटून जाताना..
तशी तुझी माझी खास ओळख नाही
तरी काठ ओलावला, तुला सोडून जाताना..
हास्य खुलले गाली गुलाबी साडी नेसताना
पुन्हा कोणी पाहिले नाही, मला ती नेसून जाताना..
तू आवडत्या गाण्याची आवडती ओळ होताना
मी पुन्हा पुन्हा ऐकले, स्वर हरवून जाताना..
गुन्हा नव्हताच यात काही बेधुंद जगण्याचा
तरी कैदेत प्रेम विरले, क्षण निसटून जाताना..
करार नव्हताच आपल्यात तसा एकत्र येताना..

Awesome. Words.... Deep feeling... One new rays... Of Tejpunj...
ReplyDeleteThank you 😊
Deleteमस्त
DeleteMesmerizing 💗💗💗💗
ReplyDeleteअप्रतिम,😊🌹💝🍫
ReplyDeleteअप्रतिम, फार सुंदर पणे भावना व्यक्त केल्या आहेत. असे वाटतेय की ही कविता जणू आपल्याच भावना आहेत .
ReplyDeleteThank you 😊
DeleteAwesome... So.. Deep thoughts.... New ray of Tej punj...
ReplyDelete👌
ReplyDeleteतेजू नात्याची अतिशय खोल बाजू तू मांडली आहेस.
ReplyDeleteकरार नव्हताच तसा एकत्र येताना... ही ओळच कसली भारी आहे. मुळात नात्यातील इतके स्वातंत्र फार कमी पहायला मिळते.
तशी तुझी माझी खास ओळख नाही... आपण तसेही एकमेकांना पूर्णपणे ओळखूच शकत नाही.
अतिशय आशयघन कविता... अर्थात गझल लिहिली आहेस.
गझल... हा तसाही माझा आवडता कवितेचा प्रकार आहे. तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला ही आनंदाची बाब आहे. आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभार! 😊🙏🙏
DeleteEvery word you write resonates with pure emotion.😍😍
ReplyDeleteहास्य खुलले गाली गुलाबी साडी नेसताना
ReplyDeleteपुन्हा कोणी पाहिले नाही, मला ती नेसून जाताना..
आय हाय... काय ओळी आहेत या... पुन्हा पुन्हा वाचून घायाळ करणार्या!
Thank you 😊
DeleteYour Marathi love poetry is a masterpiece of emotion and expression. Each line carries the weight of your heartfelt emotions, weaving a beautiful tapestry of love and longing. Your talent shines through every word, captivating the soul of the reader. Keep sharing your beautiful gift with the world.
ReplyDeleteThank you so much for your warm words 😊🙏
Deleteकरार नव्हताच आपल्यात तसा एकत्र येताना
ReplyDeleteआजही काही करार केला नाही बेधुंद जगणे धुंदीत जगताना
😃😃
😍😍😍😍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteतरी काठ ओलावला, तुला सोडून जाताना.. सरळ काळजात भिडली ही ओळ.. असेच लिहित रहा.
ReplyDelete🤩🤩👌🏼👌🏼
ReplyDelete🤩🤩👌🏼👌🏼
ReplyDeleteखूप दिवसांनी परत एकदा अस्वस्थ केलेस
ReplyDelete😊🙏
Deleteअप्रतिम, फार सुंदर
ReplyDeleteBeautiful ❤️ Deep feeling...
Too good! kaljat haath ghaltat tumche shabd
ReplyDeleteChhan.......
ReplyDeletelovely words 😍😍
ReplyDeleteकाळीज भेदणारी शब्दरचना
ReplyDeleteToo good! kaljat haath ghaltat tumche shabd
ReplyDeleteWow... Simply amazing.. Really loved the poem... Keep it up...😊🙏🏼
ReplyDeleteKhup chan madam😅👌🏻
ReplyDeleteBahut Khub...
ReplyDeleteSundar Lihile aahe!
आपण कुणाला सोडून जाणे आणि आपल्याला कोणी सोडून जाणे दोन्ही ही स्थिती वेदनादायक..
ReplyDeleteशब्द तसेही तुझ्यावर फिदा आहेत teju..
मोजू न नऊ ओळीच्या कवितेत तू एक नाते, नात्यातील तो विभक्त होण्याचा प्रसंग आणि त्यातूनही ओसंडून व्यक्त होणारे प्रेम सगळं काही मांडले आहेस अक्षरशः भावना ओतल्या आहेस.
हात निसटून जाताना, तुला सोडून जाताना, ते हास्य ती गुलाबी साडी, त्या आवडत्या गाण्याच्या ओळी सगळ अप्रतिम....
एक सांगतो ज्याने आयुष्यात असे नाते आणि असा प्रसंग अनुभवला असेल त्याच्या डोळ्यांचा काठ नक्कीच ओलावला असेल यात शंका नाही..
थोडक्यात काय खूप छान Teju. 😊
अझहर
विरह रस... हा आयुष्यात सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवला आहे.. नाते हे भाव भावनांचा गुंता असते...आणि त्यातूनच पुढे कधी ना कधी विरह रस उद्भवतो. करार नव्हताच आपल्यात या समजुतीने सुरू झालेला नात्याचा प्रवास अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात खात निरोपापर्यंत येवून पोहोचतो...त्या क्षणांचे वर्णन म्हणजे.. तुला सोडून जाताना..!
Deleteनेहेमीप्रमाणेच कवितेचे उत्तम रसग्रहण करून दिलेल्या अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अझहर..!!
Ni.shabd... angavar shaharach aala
ReplyDeleteAapka lekhan bahot sundar hai kyunki aap hamesha sahi samay ke liye sahi shabd jante hai...
ReplyDeleteThank you Shahin
Deleteखूपच हृदयस्पर्शी कविता आहे ताई💯👌👍
ReplyDeleteKhup chan madam👌
ReplyDeleteDeep meaning......
ReplyDeleteतू आवडत्या गाण्याची आवडती ओळ होताना
ReplyDeleteमी पुन्हा पुन्हा ऐकले, स्वर हरवून जाताना..
उत्कट भावनांना सामर्थ्य न उरले...
अंतकरणातून ओठांपर्यंतचे प्रवासी शब्दरूप होताना
केवळ निःशब्द😶🙏🏻
मनापासून धन्यवाद 😊🙏
ReplyDelete