नियती.. (कविता)
नियती
अंधाऱ्या रात्रीचा, सात्विक भास
गोठलेल्या वार्याचा, अनभिज्ञ श्वास
स्वप्न होवू पहात आहेत स्वार
निसटून चाललेल्या काळावर
अनियत भविष्याचा, नीरव हुंकार..
घुटमळत रहातो, अस्तित्वाचा ज्वार
मिटून दृष्टीचे, आक्षेपार्ह भार
उमलू पहात आहेत नव विचार
जुन्याच केलेल्या करारांवर
छुप्या शस्त्रांचा, मार्मिक वार..
विरक्त भावनांचा, केविलवाणा कयास
एकवटून भक्तीचा, परमोच्च ध्यास
निर्मिक घेवू पहात आहेत आकार
नियतीच्या अनामिक खेळावर
सृष्टीच्या उदरातील, ब्रह्मांड गर्भार
सृष्टीच्या उदरातील, ब्रह्मांड गर्भार...

Very nice thought 👍
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखर आहे नियती
छान
ReplyDeleteतुमचे लेखन मधून नविन काय ना शिकण्यास मिळत असतं..... असे वाटत की मी काही च नाही शिकलो.. तुमच्या वेगवेगळ्या लेखनात बरच काही शिकण्यास मिळत असल्याने आम्ही एकदम आनंदी आहे.. thank you..
ReplyDelete