हा खेळ माझा नव्हे..
हा खेळ माझा नव्हे..
वाटते मला असे की, हे शब्द माझे नव्हे
गुंतलेल्या या शरीरातील, हे प्राण माझे नव्हे..
सोसलेल्या वेदनांची, देणी-घेणी बरीच बाकी
मांडला तो सारा हिशोब, हा खेळ माझा नव्हे..
व्यक्त झाल्या भावनांचा, अर्थ गहिरा दाटला
घेतला जो तू मनात, तो सार माझा नव्हे..
गुंफलेल्या जाणिवांची, माळ कोणी सांधली
छेडलेल्या त्या स्वरातील, तो सूर माझा नव्हे..

Apratim
ReplyDelete😊🙏
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteThank you.
Deleteछान लिहिलं आहेस. व्यक्त होणे सोपे नसते ते जमावे लागते. तुझ्या कवितांतून तू खूप छान व्यक्त होतेस.
ReplyDeleteकविता करणे हा खेळ माझा नव्हे पण तू केलेल्या कवितांतून काव्य वाचनाचा आनंद घेणे हे मला मनापासून आवडते.
सौर
Thank you सौरभ दा 😊😊
Deleteखूपच छान मस्त
ReplyDeleteखेळ माझा नव्हे...
ReplyDeleteपुन्हा एक छान अर्थपूर्ण कविता वाचनात आणल्याबद्दल तुझे धन्यवाद teju.. मी जर प्रियकर किंवा प्रेयसी असेन तर माझ्यासाठी प्रेम भावना व्यक्त करणारी एक छान अशी कविता आहे ही. आयुष्यात आपण जेंव्हा निस्वार्थ नात्यात असतो तेंव्हा सगळं काही आपले असते असते पण आपले असे काहीच नसते..
प्राण माझा नव्हे, सुर माझा नव्हे, आणि हा खेळ माझा नव्हे..
धन्यवाद अझहर! ही कविता तशी अनेक भावभावनांनी गुंफलेली आहे. अनेकवेळा आपण जे अनुभवतो, आपल्याला जे जाणवते ते प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तीला जसेच्या तसे समजेलच असे नाही.. अशावेळी भावभावनांचा जो कल्लोळ होतो त्यातून अनेक अर्थ निघतात..जे आपल्याला अभिप्रेत असताच असे नाही... म्हणुन हा खेळ माझा नव्हे!
DeleteAwesome 💐
ReplyDeleteह्या कवितेतून स्री जीवनाचे दर्शन होते श्री आयुष्यभर कष्ट करून जगते तिचे काहीच नसतं उदाहरणार्थ मुलांना जन्म देऊन संगोपन करून सुद्धा शाळेच्या यादीत नाव पतीचे लागते हा स्री जन्माचा सर्वात मोठा त्याग असतो
ReplyDeleteखूप सुंदर!
ReplyDeleteमनात भावनांची, विचारांची होत असलेली घालमेल सुंदर शब्दांत व्यक्त करतो तो खरा कवी! मग ती घालमेल आपल्या मनातली असेल वा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनातली. कवीमन कुठेही स्वच्छंद विहारू शकतं. अथांग महासागरात डुबकी मारून पृथ्वीचा गर्भ शोधू शकतं तर कधी सूर्याला स्पर्श करून बरसणार्या पावसाच्या प्रत्येक तुषारासोबत अलगद धरतीवर उतरू शकतं.. अशीच लिहित रहा अन् व्यक्त होत रहा!
धन्यवाद मंगेश! कवि त्याच्या भावना शब्दात व्यक्त करून रिता होतो...वाचकाने त्याच्या त्याच्या समजुतीने तिचा रसास्वाद घ्यावा. तुमच्या सारख्या वाचकांचे अभिप्राय लिखाणासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतात.
DeleteVery Beautiful👌👌
ReplyDeleteमनातील भावनांचा कल्लोळ अत्यंत सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे. मार्मिक भाष्य आहे.
ReplyDeleteखुप छान.....
ReplyDelete