संभ्रम... युगानुयुगांचा..!

 संभ्रम

शाश्वत.. अढळ असे काही नसतेच 

आणि हे सगळे एक दिवस संपणारच 

ही घाबरून सोडणारी भावनाच 

तिच्या आत्मविश्वासाच्या उडवतेय 

चिंधड्या चिंधड्या..!


तिला होताच येत नाही स्वार

विचारांचा हा आत्मघातकी स्वैराचार

काहूर माजवतोय मनाचा भ्रष्टाचार

तिच्यातील 'मी'ला करून स्तब्ध 

उसळतोय संभ्रमांचा दुराचार..!


'ती' महाभारतातील गांधारी,

सुभद्रा, कुन्ती अथवा दमयंती,

ती रामायणातील कौशल्या,

ऊर्मिला, सुमित्रा अथवा मंदोदरी..!


                                           - तेजश्री शिंदे 

Comments

  1. Very nice 👌👍

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर

    ReplyDelete
  3. Khup sundar 👌👌

    ReplyDelete
  4. Replies
    1. Very nice ....very well articulated the mind in the words... Congratulations sister

      Delete
  5. शाश्वत

    ReplyDelete
  6. खूप छान काव्य.. स्त्रीमनाचा ठाव घेणारी रचना! 👌

    ReplyDelete
  7. मस्त खूप छान 👌👌👌👌💐

    ReplyDelete
  8. Very Nice 👌🏻😊

    ReplyDelete
  9. भ्रम आणि संभ्रम...
    तिच्यातील "मी" आणि महाभारतातील ती....
    ती .. च्या हृदयाची स्पंदने एक ताल आणि सुरात ऐकल्याचा भास होतो तुझे हे शब्द वाचताना. आत्मविश्वासाच्या चिंधड्या, आत्मघातकी स्वैराचार, मनाचा भ्रष्टाचार, संभ्रांचा दुराचार हे शब्द मनात एक हुंकार भारतात आणि स्फुरण चढवतात. ती.. चे हुंदके आणि मुसमुसने तू यापूर्वी ही शब्दांकित केले आहेस पण आज ती.... च्या भावना अगदी महाभारतातील ती ते आताची ती यांच्या भावना व्यक्त करण्याचे काम तू शब्दांनी केले आहेस. खूपच छान... ज्या पद्धतीने मी कौतुक करतोय त्याहीपलीकडे मला तुझ्या शब्दांचे कौतुक करायचे आहे पण माझा शब्दसाठा एवढा नाही, समजून घे teju....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अझहर! कवितेला चांगला वाचक लाभणे हे देखील भाग्याचे आहे. माझ्या सगळ्याच कवितांचे परीक्षण तू अतिशय मार्मिकपणे करत असतोस. माझ्या इतर वाचकांना देखील कविता समजून घेणे त्यामुळे सोपे होते. प्रत्येकाचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. त्यातून तो त्या कवितेकडे पाहत असतो... त्यामुळे कविता ही अनेक अंगांनी उलगडत जाते.

      Delete
  10. अप्रतिम लिखाण , चपखल शब्दरचना , मनाला भिडणारी कविता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.