आंदण..'ती'चा स्विकार!

 आंदण


मी जंग जंग पछाडले 

मुक्तीच्या वाटा तुडवत,

रक्तबंबाळ या पावलांनी 

परतीचा मार्ग पाहिला नाही.


होय मी कधीच स्त्रीत्वाचा 

त्याग केला नाही.


मी निर्वस्त्र होऊन अनुभवले 

स्त्रीच्या गर्भार वाटा,

मुसमुसूलेल्या रात्रीच्या 

उसवत्या रेघान रेघा


मी आयुष्याला फुलवत गेले 

जगण्याच्या आशा उंचावत,

घुसमटलेल्या जीवाने,

कधीच 'हाय' म्हंटले नाही.


मी बाईपण उलगडले 

शोधत माणुसकीच्या खुणा,

बापाने दिलेले आंदण 

रागाने झिडकारले नाही.


होय मी कधीच स्त्रीत्वाचा 

त्याग केला नाही.


                                          - तेजश्री शिंदे 

Comments

  1. सुपर 👌👌👌 बाईचं सामर्थ्य दाखवणारी सर्जनशील कविता

    ReplyDelete
  2. खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  3. ती स्त्रीच आहे, जिने आयुष्य जगायला शिकवलं

    ती स्त्रीच आहे, जिने त्या जगण्याला अर्थ दिला

    ती स्त्रीच आहे, जिने त्या अर्थाला शब्द दिले

    ती स्त्रीच आहे, जिने अर्थाला शब्दांमध्ये बदलल.

    ReplyDelete
  4. स्त्रीच मनातल मोकळ पण मांडलस

    ReplyDelete
  5. खुप सुंदर मॅडम

    ReplyDelete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. स्री पुरुषापेक्षा किती सहनशील असते हे व्यक्त होते

    ReplyDelete
  8. बाबुराव घुगे
    ईश्वराने श्रीला दिलेले सहनशीलतेची देणगी या कवितेतून व्यक्त होत आहे

    ReplyDelete
  9. लिंग ही संकल्पना सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही स्त्रीला मिळालेले लिंग हे वडिलांकडून प्राप्त होणारे 'आंदण" होय. जिचा स्वीकार तीने बाई म्हणून केला आहे.

    ReplyDelete
  10. Chhan madam apratim

    ReplyDelete
  11. काय शब्द आहेत teju. मी तुला नेहमी म्हणतो तू वास्तव मंडतेस अगदी प्रखरपणे पण शब्दांची सभ्यता सांभाळून. आज पुन्हा तेच पाहायला मिळाले. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये स्त्रिमनाची घुसमट तू अगदी प्रखर शब्दात मांडली आहेस आणि ते वाचून मनाच्या संवेदना भाजून निघतात. आजही ही परिस्थिती आहे, शिकलेली आणि उच्चपदस्थ स्त्रिमन सुद्धा यातून सुटलेले नाही. मुसमुसलेल्या रात्री सहन करून असंख्य स्त्रिमने पुन्हा नव्याने जबाबदारी पेलत आपल्या भोवती वावरत आहेत याचीआपल्याला पुसट सुद्धा जाणीव नसते . रक्तबंबाळ होवून परतीची वाट न पाहणाऱ्या आणि स्त्रीत्वचा त्याग न करणाऱ्या अश्या असंख्य अभिमानी स्त्रिमनामुळे माझ्यासारखे पुरुषी स्वाभिमानाने जगासमोर उभा आहे . खरच आजपर्यंत बायीपण बऱ्याच जणांनी मांडले आहे, परंतु बाईपण आणि बाईमन तू एक वेगळ्याच आणि खूप छान प्रकारे मांडले आहेस. सलाम बईपणाला..

    ReplyDelete
  12. खूप खूप धन्यवाद अझहर... कवितेचा उलगडा इतक्या सुंदर पद्धतीने केल्याबद्दल! ...बाईपण आणि बाईमन समजून घेणारे पुरुष तसेही दुर्मिळ आहेत. तुझा प्रयत्न स्तुत्य आहे. कवितेचा गाभा तुला उमजला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.