पुस्तकातील पानापानांतून..
पुस्तकातील पानापानांतून..
पुस्तकातील पानांसारखं
तुलाही वाचता आलं असतं
तर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं
शोधली असती पुढच्या पानात..
शब्दांची कोडी उलगडत
घेतला असता शोध
सुटून गेलेल्या क्षणांचा
अन गुरफटलेल्या भावनांचा..
इतकी सहजता
जर आली असती आपसूक
तर दडलेल्या संवेदना
उलगडत गेल्या असत्या
पुस्तकातील पानापानांतून..
काळ थांबवून
मागील पाने उलटत
पुन्हा शोध घेतला असता
न कळलेल्या अर्थांचा
गुलदस्त्यातील गुपितांचा
तुला वाचून समजून घेणं
अधिक सोपं झालं असतं
जर तू सामावला असतास
पुस्तकाच्या पानापानांत
जर तू सामावला असतास
पुस्तकाच्या पानापानांत...!

खूपच छान आहे
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमाहित नाही अजून शब्दातून काय काय उरले, पण शब्दात शब्द गुंफून मन मात्र मोकळे केले....
ReplyDeleteकविता ही अशीच व्यक्त होत असते...
Deleteकविता खूपच छान आहे,,,
ReplyDeleteपुस्तकातील पानासारख ,,
खर असते तर आयुष्य खूप सोपे
झाले असते
मस्त,
Thanks Satish.
Deleteसुंदर👌
ReplyDelete😊🙏
Deleteतेजा
ReplyDeleteसहज सोपे शब्द पण त्यातील भाव आणि अर्थ खूप छान. मन मोकळं करता येणं आणि ते मोकळं मन शब्दबद्ध करता येणं आणि शब्दातून व्यक्त करता येणं ही कला आहे आणि तुला खूप सुंदर छान आणि प्रभावी पद्धतीने जमत. लेख/कविता दोन्ही प्रकार उत्तमरीत्या लिहितेस तू.
खूप खूप अभिनंदन आणि लिहीत राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
धन्यवाद सौरभदा 😊
Deleteखूप आवडली कविता
ReplyDelete😊🙏
Deleteपाना पानातून, खूप छान. आधी तुझ्या मुखपृष्ठाच्या फोटो चे कौतुक करू, पुस्तकात हरवलेली, पुस्तक वाचताना वास्तवाचं भान हरोलेली एखादी युवराज्ञी सारखी दिसत आहेस तू.(डायना). पुस्तकाच्या पानातून ही कविता खूप काही सांगून जाते. नाती जपत असताना कधी कधी समोरच्याला आपण समजू शकत नाही त्याच्या भावना आपल्यापर्यंत आणि आपल्या भावना त्याच्यापर्यंत जश्या च्या तश्या पोहचत नाहीत. अश्यावेळी मनाची जी अवस्था असते ती या शब्दातून व्यक्त होत आहे. खरच जर एखाद्याला पुस्तकं स्वरूपात वाचता आले असते तर? किंवा आपल्याला पुस्तकाच्या पानात समावता आले असते तर?
ReplyDeleteखूप काल्पनिक विषय अत्यंत गोड शब्दात मांडला आहेस. वाचकाला काही क्षणासाठी का असेना हा प्रश्न पडतो आणि तो आपल्या कल्पनाविश्वात नकळत झेपावतो. खरच वाचता आल असतं तर?
कौतुकासाठी धन्यवाद अझहर...माझी तुलना सरळ डायना सोबतच केलीस. असो. कवितेचा विषय तू अचूक समजून घेतला आहेस. अनेकवेळा आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असे होत असते. एकमेकांना नक्की काय बोलायचे आहे हे स्पष्ट होत नाही...अशावेळी पुन्हा मागे जाऊन ते समजून घेण्याचा मोह होतो... आणि हे आपल्या खास व्यक्तींच्या बाबतीतच घडते.
Deleteअतिउत्कृष्ट कविता आहे आम्ही शाळेत जेवढ्या कविता नाहीत वाचल्या तेवढ्या तुमच्या लेखनातून वाचावयास मिळत आहेत.जुन्या आठवणी. कॉलेज चे दिवस.. आणि इतर आपणाकडून आम्हांला रोज कवितेची मेजवानीच मिळत आहे.thank you खूप छान आहे कविता खाकी वर्दीतील कवी 👍👍
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!😊🙏
Deleteव्यक्तीला पुस्तक स्वरूप वाचण्याची दुर्दम्य इच्छा यातून दिसून येत आहे !!!
ReplyDeleteवर्दीतील एक दर्दी .....
Thank you 😊
Deleteपहिलेच कडव वाचले ..आणि माझा तोंडून निघाले खरंच😅❤️असे वाचता आले असते तर किती छान झाले असते.
ReplyDeleteतुला वाचून समजून घेणं
अधिक सोपं झालं असतं
जर तू सामावला असतास
पुस्तकाच्या पानापानांत (खूपच छान)❤️
Thanks Riya 😊
Delete