बंध....मुक्तीच्या मार्गाने प्रवास करणारे!


 


 बंध


बाई म्हणुन खडतरच बंधमुक्त होत जाणं.

तिला बदलावे लागेल अंतर्मन..नि

वैचारिक द्वंद्वातून मुक्त करावे लागेल स्वत्वाला

एक एक चौकट विस्कळित करत..!


शोधावी लागतील तिच्या अस्तित्वाची मूल्यं,

जी तिची असतील तिच्या जाणीवांसह..

हा प्रवास हलवून सोडेल नि हादरे बसतील 

ती जिवंत असण्याला....पण 


प्रेमाचे कारंजे होतील सोबती नि ती सहज तरून जाईल..

भूतकाळातील चुकलेले अंदाज; फसलेली नाती,

फुटतील प्रेमाचे नवे पन्हाळे; जे वाहून नेतील दुःखाचा डोंगर,

पुन्हा होईल नवनिर्मिती; माणूस म्हणुन जगण्याची..!!


हे स्विकारलेपण अधिक परिपक्व असेल 

जे छेद देत जाईल प्रेमाच्या सामाजिक संकल्पना 

नि स्वीकृतिची समीकरणे अधिक व्यापक होतील 

जीवन पुन्हा नव्याने समजून घेताना ..


जीवन पुन्हा नव्याने समजून घेताना..!!


                                              - तेजश्री शिंदे 



Comments

  1. उभारी देणारी आणि उमेद जगवणारी कविता...👌👍

    ReplyDelete
  2. होय... यात बरीच सकारात्मकता आहे.

    ReplyDelete
  3. बंधमुक्त होण्याचा प्रवास शब्दात चांगला गुंफलाय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.