कालचक्र.. ज्यातून मार्गक्रमण करत तो होत जात आहे समृद्ध!
कालचक्र
रहस्यमय गोष्टींचा असमंजस इतिहास
उतरू पहात आहे भविष्यात नि
निर्माण करू पहात आहे
तत्कालीन विचारांचा मूर्तिमंत मेरू
जो शक्यता चाचपडत कानोसा घेत
बदलत आहे वर्तमानातील सत्ता..!
हा त्रिकाळातील खेळ अविरत चालू रहातो
बदल घडवत कोणत्याही निश्चित स्वरूपाशिवाय
जो अनिवार्य आहे सृष्टीच्या दोलकासह,
पुन्हा कधीही फिरून न येण्यासाठी..!!
कोणतीही शाश्वती नसताना केवळ आशेचे किरण घेऊन
तो धावत आहे अनामिक गर्तेतून एका निश्चित ध्येयासाठी
हे कालचक्र धुमसत आहे त्याच्या नसानसातून
तो ठाम आहे पुन्हा एकदा व्युत्पत्तीचे मार्गक्रमण करण्यास,
नि विचारांचा आसमंत भावनेसह उजळून टाकण्यास..
कारण, तो निश्चल..अविकारी...बुद्ध आसक्त
जो काळाच्या ओघात समृद्ध होत जात आहे..!!!
- तेजश्री शिंदे

Very nice
ReplyDeleteThank you so much..!
DeleteMast 👍
DeleteVery nice
ReplyDeleteThank for your comment.
DeleteVery Nice mam
ReplyDeleteThank you sir. 😊
DeleteVery nice
ReplyDeleteThanks Sachin 😊
DeleteNice
ReplyDeleteThanks Shital 😊
Deleteखुप छान आहे
ReplyDeleteSuperbbb... Words...
ReplyDelete