Posts

Showing posts from March, 2025

मामाचं गाव... म्हणजे आठवणींचं गोजिरं दालन!

Image
  मामाचं गाव   आठवणींचं गोजिरं दालन!                 एप्रिल महिना जवळ आला की… मुलांच्या परीक्षा, त्यांचा अभ्यास, निकालाची धावपळ—सगळं डोक्यात घर करून राहतं. पण एखाद्या शांत सायंकाळी, चहाचा कप हातात घेऊन निवांत बसले की, नकळत मन भूतकाळात डोकावून जातं. मामाचं गाव… शाळेची सुट्टी… आणि मग मी पुन्हा लहान होते. बालपणाची ती स्वप्नं मनात हळूवार तरळू लागतात.                  तो प्रवासच खास होता… गाडीत बसताच मनात एकच उत्सुकता असायची—कधी एकदा मामाच्या गावाला पोहोचतोय! खिडकीतून डोकावलं की दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं दिसायची, मधूनच लांबच्या आभाळात तरंगणारे ढग, त्यांच्याशी स्पर्धा करणारी उंच झाडं, आणि मधूनच एखादा डोंगर ओलांडताना कानांत गोड बधीरपणा यायचा. आईने बांधून आणलेला डबा उघडताना त्यातली शेंगदाण्याची चटणी-चपाती, गूळपोळीचा गोडवा, आणि मधूनच गाडीत येणारा काळी  मैना, करवंद, पेरू विकणाऱ्यांची हाक… या सगळ्यात तास कधी उलटून जायचे कळायचंही नाही.                   ...

राम आणि बुद्ध: त्यागाचा वनवास की आत्मशोधाचा प्रवास?

Image
"चांगले मित्र असतील, तर तुमचा विचार अधिक समृध्द आणि विकास सर्वांगीण होतो."  असाच एक मित्र, जो नेहमी वेगळ्या वाटा सुचवत असतो, त्याने एक भन्नाट कल्पना सांगितली. तो म्हणाला— "रामाला वनवास हा सीता व लक्ष्मण सोबत होते म्हणून वनवास वाटला. ते सोबत नसते, तर रामाला तो बुद्धासारखा वाटला असता. बुद्ध 10,000 वर्षं आधीच मिळाला असता…!" काय अद्भुत आणि खोल विचार आहे! हा विचार ऐकताच मनात अनेक प्रश्न उमटले. राम आणि बुद्ध—एकाने कर्तव्याचा मार्ग पत्करला, तर दुसऱ्याने वैराग्याचा. पण रामाचा प्रवास एकटा असता, तर तो त्यागाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आत्मशोधाच्या वाटेवर गेला असता का? हा विचार मनात रुजला, पण… मी अनेकदा या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटायचं.  माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येत राहायचा—"आपल्यात इतकी वैचारिक परिपक्वता आहे का?" आणि त्यामुळे कित्येकदा लिखाण अर्धवट राहायचं. पण आज, तेच सगळे अर्धवट विचार पुन्हा वाचताना…त्यांना माझ्या भाषेत मांडायचं ठरवलं. हा फक्त एक विचार आहे…कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. आपण एकमेकांच्या विचा...

सुंदरता का मौन... एक एहसास!

Image
सुंदरता का मौन संभव नहीं था प्रेम के बिना सुंदरता का अर्थ समझना, जैसे भोर की पहली किरण में रात का सारा मौन घुल जाता हो, या जैसे बरगद की छाँव में थका मुसाफिर सुकून पा जाता हो। वो आँखों में उतरकर दिल तक पहुँचा, जैसे सावन की बूंदें प्यासी धरती को सहलाती हों, या जैसे जलते दीपक की लौ में अंधकार खुद को सजा लेता हो। हर रूप में सौंदर्य ऐसा रचा, जैसे टूटते तारे ने मन की गहराइयों में एक अनकही दुआ छोड़ दी हो, या जैसे किसी अनजान राह में अचानक अपना सा कोई मिल गया हो। शब्द मौन हो गए एहसास के आगे, जैसे मंदिर के घंटों में घुली प्रार्थना, और धड़कनों ने तस्वीरें बना दीं, मानो मन के आँगन में कोई पुरानी स्मृति फिर से महक उठी हो। प्रेम ने सिखाया कि सुंदरता, सिर्फ देखने में नहीं, महसूसने में बसती है, जैसे मन के कोने में छिपा अधूरा सपना, या आत्मा की आँखों से उजागर हुआ सत्य।                                              - तेजश्री शिंदे ✍️

अस्तित्वाच्या परिघाबाहेर ..घेतलेला विसर्जनशील शोध!

Image
  अस्तित्वाच्या परिघाबाहेर  मी शब्द होते, अर्थांच्या कचाट्यात अडकून पडलेली, स्वतःचा गाभा गमावून बसलेली. मग मी त्या अर्थांना विलीन होऊ दिलं, आणि मी केवळ ध्वनी झाले. मी ध्वनी होते, गूढ अवकाशाच्या पोकळीत भरकटणारी. प्रतिध्वनीसारखी स्वतःकडे परतणारी, पण कोणत्याच आधाराला भिडू न शकणारी. मग मी त्या नादात विरघळले, आणि मी शांतता झाले. मी शांतता होते, पण रिक्त नव्हे— असण्या-नसण्याच्या सीमारेषेवर विसावलेली. मी स्वतःलाच शून्यात दडपलं, विचारांच्या आणि जाणिवांच्या अतितीरी ओलांडत गेले. मग मी त्या शून्यात विलीन झाले, आणि मी शोध झाले. शोध… जो दिशाहीन आहे, तरीही प्रत्येक दिशेचा केंद्रबिंदू, जो प्रवास आहे, पण प्रत्येक टप्प्यावर विसर्जित होणारा, जो कालातीत आहे, पण काळाच्या स्पंदनात गुंतलेला, जो उत्तर शोधतो, पण शेवटी स्वतःच्या शून्यातच लुप्त होतो. मी त्या शोधात अंतर्भूत झाले… की शोध माझ्यात आत्मसात झाला? मी उरले… पण स्वरूपहीन. मी हरवले… पण अनंतात विस्कटले. मी अस्तित्वाच्या परिघाबाहेर गेले. - तेजश्री शिंदे ✍️                      ही कविता स्वतःच...

अजूनही भटकते आहे..(गझल)

Image
अजूनही भटकते आहे.. तुला गवसला का रे शेवटचा किनारा? मी लाटांसारखी अजूनही भटकते आहे… तुझ्या ओठांवरती उमटला शांततेचा शहारा, मी मात्र स्वरांच्या खोल तळात बुडते आहे… तू विरलेले धुके, मी दवबिंदू तुझ्या शोधात, पहाटेच्या उन्हातही अलगद सांडते आहे… मनाच्या किनाऱ्यावर तुझे शब्द तरंगले, मी प्रत्येक लहरीत तुझा भाव शोधते आहे… तुझ्या आठवांचा गंध दरवळतो अजूनही, मी सावलीसारखी तुझ्यामागे झुरते आहे… तुला गवसला का रे शेवटचा किनारा? मी लाटांसारखी अजूनही भटकते आहे…           - तेजश्री शिंदे ✍️