अस्तित्वाच्या परिघाबाहेर ..घेतलेला विसर्जनशील शोध!
अस्तित्वाच्या परिघाबाहेर
मी शब्द होते,
अर्थांच्या कचाट्यात अडकून पडलेली,
स्वतःचा गाभा गमावून बसलेली.
मग मी त्या अर्थांना विलीन होऊ दिलं,
आणि मी केवळ ध्वनी झाले.
मी ध्वनी होते,
गूढ अवकाशाच्या पोकळीत भरकटणारी.
प्रतिध्वनीसारखी स्वतःकडे परतणारी,
पण कोणत्याच आधाराला भिडू न शकणारी.
मग मी त्या नादात विरघळले,
आणि मी शांतता झाले.
मी शांतता होते,
पण रिक्त नव्हे—
असण्या-नसण्याच्या सीमारेषेवर विसावलेली.
मी स्वतःलाच शून्यात दडपलं,
विचारांच्या आणि जाणिवांच्या अतितीरी ओलांडत गेले.
मग मी त्या शून्यात विलीन झाले,
आणि मी शोध झाले.
शोध…
जो दिशाहीन आहे, तरीही प्रत्येक दिशेचा केंद्रबिंदू,
जो प्रवास आहे, पण प्रत्येक टप्प्यावर विसर्जित होणारा,
जो कालातीत आहे, पण काळाच्या स्पंदनात गुंतलेला,
जो उत्तर शोधतो, पण शेवटी स्वतःच्या शून्यातच लुप्त होतो.
मी त्या शोधात अंतर्भूत झाले…
की शोध माझ्यात आत्मसात झाला?
मी उरले… पण स्वरूपहीन.
मी हरवले… पण अनंतात विस्कटले.
मी अस्तित्वाच्या परिघाबाहेर गेले.
- तेजश्री शिंदे ✍️
ही कविता स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रवास मांडते. आपलं अस्तित्व अनेक संकल्पनांमध्ये अडकलेलं असतं—शब्द, अर्थ, आवाज, शांतता—या सगळ्या टप्प्यांमधून जात जात अखेरीस आपण शून्यात विलीन होतो.
"मी कोण आहे?" हा प्रश्न खूप खोल आहे. आपण फक्त शरीर नाही, विचार नाही, भावना नाही—तर त्याही पलीकडचं काहीतरी आहोत. अस्तित्वाच्या मर्यादा ओलांडून, स्वतःला विसरून, आपण संपूर्ण विश्वाचा एक भाग होतो.
म्हणूनच, हा असण्या-नसण्याच्या संकल्पनांना पार करणारा आणि स्वतःला हरवून स्वतःलाच सापडण्याचा एक गूढ, अद्वैत प्रवास आहे. वाचक म्हणून तुम्ही देखील या प्रवासाची अनुभूति घ्यावी या विचाराने आपल्यासोबत हा काव्यरूपी संवाद साधत आहे.

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा या ओळीप्रमाणे आपली कविता आयुष्याचे न उघडणार कोड सांगणारी आहे.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏
Deleteखूप छान 👌👍
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteजबरदस्त 💐🙏
ReplyDeleteExplained beautifully 😍😍😍😍 loved it 💞💞💞
ReplyDeleteशब्द म्हणजे जीवनाची अर्थपूर्ण मौल्यवान संहिता .......खूपच प्रेरणादायक शब्द आणि स्वत्व याविषयीची सुरेख मांडणी ......
ReplyDeleteखूप सुंदर👍
ReplyDeleteजीवनाच्या प्रवासात आपली कविता नक्कीच पर प्रेरणादायी ठरेल. एक नवीन ऊर्जा देण्याच काम करेल.
ReplyDeleteAcha hai
ReplyDeleteWaa eak number..khup chan vichar ahe...very good.. excellent
ReplyDeleteMast teju
ReplyDeleteWow
ReplyDeleteकोहम ते सोहम.... मी मुळात कोण आहे ? हे शोधण्याचा प्रवास म्हणजे च आध्यात्म. अस्तित्वाच्या गाभ्याशी फक्त आणि फक्त असते ती असण्याची जाणीव आणि या जाणीवेला कोणतीच ओळख नसते.
ReplyDeleteखूप सुंदर शब्द रचना 👌
Thank you Vivek 😊
Deleteह्या शोधातच आपण अध्यात्माच्या दिशेने वाटचाल करु लागतो, खुप सुंदर आणि काव्यात्मक मांडणी ..🔥
ReplyDeleteThank you Suchitra 😊
DeleteKavita mhanje manala bhidnari aahe swatch sodh astitvachi chaul kashi aste hey tumhi pratyk sabdatun sabd sangitl aahe khup chan
ReplyDelete