मी निमित्तमात्र...आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ!


  मी निमित्तमात्र


घडणार्‍या घटना दोलायमान काळातून 

सरकत रहातात अविरत..

मी एकटाच विचारांच्या पिंजर्‍यात 

कोणत्याही अटीशर्तींशिवाय

दोन श्वासांच्या मधले गुदमरणारे आयुष्य 

घटनांचा क्रम जुळवत..

मी शिकतोय रंगहीन होत जाण्याची

पाण्यासारखी जुजबी कला..

या रासायनिक प्रक्रिया

कितीही नकोशा वाटल्या तरी 

सरधोपट गिरवत रहातो कित्ता 

यातूनही घडेल काहीतरी उगाच 

आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ

मी घडत जातोय की घडवला..

हा प्रश्नांचा गुथ्था की विचारांचे चक्र

अनवरत फिरत रहाते काळाच्या ओघात 

ही कसली पडझड हा कसला इतिहास 

मी निमित्तमात्र...निःशब्द..निश्चल..!


                                                               - तेजश्री शिंदे ✍️ 


Comments

  1. Waah... deep and powerful

    ReplyDelete
  2. Vidrohi Kavita...! Apt words

    ReplyDelete
  3. Your poems make me think deeply. After reading at least 4-5 times, the poem begins to unravel a little more.. great writing skill...!

    ReplyDelete
  4. Deep thought😍😍😍😍👍👍👍 lovely

    ReplyDelete
  5. वाह! खूप छान तेजू!
    तुझा..
    स्वतः स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न
    स्वतःस स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न
    दोन श्वासांमध्ये गुदमरणारे आयुष्य मुक्त करण्याचा प्रयत्न
    दोलायमान आयुष्यातून कळत नकळत घडत जाण्याचा प्रयत्न
    अन्‌..
    सरतेशेवटी निश्चल निःशब्द राहून सारं काही बोलून जाण्याचा प्रयत्न
    खूप छान आहे!!!
    Keep expressing yourself with your beautiful writing!...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मंगेश... समजायला थोडी जड असली तरी त्यातील मर्म तू अचूक ओळखले आहेस... गोंधळ, संभ्रम, शोध अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाची ही कविता.

      Delete
  6. Deep ahe thoughts

    ReplyDelete
  7. Nice though madam

    ReplyDelete
  8. निःशब्द 🤗🤗🤗

    ReplyDelete
  9. I always love to read your poetry... they inspired me a lot ✨️

    ReplyDelete
  10. एक एकटा एकांत... जबरदस्त...किती खोल विचार आहेत यामधे..मस्तच

    ReplyDelete
  11. मी शिकतोय रंगहीन होत जाण्याची
    पाण्यासारखी जुजबी कला.. जहरी शब्द रचना !

    ReplyDelete
  12. Deep thoughts... with apt words

    ReplyDelete
  13. Kya baat.. Kya baat.. Kya baat..! ❤️

    ReplyDelete
  14. खूपच सुंदर लिहिलं आहे. उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. मनाची घालमेल , उत्कंठा सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे. तुमचे छायाचित्र खूप बोलके पण आहे आणि nishabad पण आहे. दोन्ही भावना व्यक्त होत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏

      Delete
  15. Very nice ❤️🍫

    ReplyDelete
  16. Sundar pan bhhedak.. angavar shahare aananare shabd and kathhor Ashi vastaviktecha varnan .. mala tumche he shabd bhhidle..
    मी घडत जातोय की घडवला.

    ReplyDelete
  17. मी शिकतोय रंगहीन होत जाण्याची
    पाण्यासारखी जुजबी कला..
    Nishabd keleyt

    ReplyDelete
    Replies
    1. आपण सगळेच पाण्यासारखे गुणधर्म स्वीकारत जगण्याचा प्रयत्न करत असतो.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.