मी निमित्तमात्र...आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ!
मी निमित्तमात्र
घडणार्या घटना दोलायमान काळातून
सरकत रहातात अविरत..
मी एकटाच विचारांच्या पिंजर्यात
कोणत्याही अटीशर्तींशिवाय
दोन श्वासांच्या मधले गुदमरणारे आयुष्य
घटनांचा क्रम जुळवत..
मी शिकतोय रंगहीन होत जाण्याची
पाण्यासारखी जुजबी कला..
या रासायनिक प्रक्रिया
कितीही नकोशा वाटल्या तरी
सरधोपट गिरवत रहातो कित्ता
यातूनही घडेल काहीतरी उगाच
आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ
मी घडत जातोय की घडवला..
हा प्रश्नांचा गुथ्था की विचारांचे चक्र
अनवरत फिरत रहाते काळाच्या ओघात
ही कसली पडझड हा कसला इतिहास
मी निमित्तमात्र...निःशब्द..निश्चल..!

Waah... deep and powerful
ReplyDeleteVidrohi Kavita...! Apt words
ReplyDeleteYour poems make me think deeply. After reading at least 4-5 times, the poem begins to unravel a little more.. great writing skill...!
ReplyDeleteThank you 😊
DeleteDeep thought😍😍😍😍👍👍👍 lovely
ReplyDeleteवाह! खूप छान तेजू!
ReplyDeleteतुझा..
स्वतः स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न
स्वतःस स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न
दोन श्वासांमध्ये गुदमरणारे आयुष्य मुक्त करण्याचा प्रयत्न
दोलायमान आयुष्यातून कळत नकळत घडत जाण्याचा प्रयत्न
अन्..
सरतेशेवटी निश्चल निःशब्द राहून सारं काही बोलून जाण्याचा प्रयत्न
खूप छान आहे!!!
Keep expressing yourself with your beautiful writing!...
धन्यवाद मंगेश... समजायला थोडी जड असली तरी त्यातील मर्म तू अचूक ओळखले आहेस... गोंधळ, संभ्रम, शोध अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाची ही कविता.
DeleteDeep ahe thoughts
ReplyDeleteThanks Priya
DeleteNice though madam
ReplyDeleteनिःशब्द 🤗🤗🤗
ReplyDeleteI always love to read your poetry... they inspired me a lot ✨️
ReplyDeleteThank you 😊
Deleteएक एकटा एकांत... जबरदस्त...किती खोल विचार आहेत यामधे..मस्तच
ReplyDeleteSuperrr
ReplyDeleteमी शिकतोय रंगहीन होत जाण्याची
ReplyDeleteपाण्यासारखी जुजबी कला.. जहरी शब्द रचना !
Thank you 😊
DeleteDeep thoughts... with apt words
ReplyDeleteKya baat.. Kya baat.. Kya baat..! ❤️
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलं आहे. उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. मनाची घालमेल , उत्कंठा सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे. तुमचे छायाचित्र खूप बोलके पण आहे आणि nishabad पण आहे. दोन्ही भावना व्यक्त होत आहे.
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
DeleteVery nice ❤️🍫
ReplyDeleteSundar pan bhhedak.. angavar shahare aananare shabd and kathhor Ashi vastaviktecha varnan .. mala tumche he shabd bhhidle..
ReplyDeleteमी घडत जातोय की घडवला.
Thanks Riya...!
Deleteमी शिकतोय रंगहीन होत जाण्याची
ReplyDeleteपाण्यासारखी जुजबी कला..
Nishabd keleyt
आपण सगळेच पाण्यासारखे गुणधर्म स्वीकारत जगण्याचा प्रयत्न करत असतो.
DeleteSuper 👌👌
ReplyDelete