गंध.. प्रेमाचा दरवळ!



 गंध..


तुझ्या एका स्पर्शाने, मी फुलून येतो 

गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो..


भेट एकांती मला, मी हरपून येतो 

मेघ हो पावसाचा, मी मृदगंध होतो..


बहरता हा वसंत, मी मोहरून येतो 

गाली गुलाबी रंगाचा, मी मधुमास होतो..


साद घाल मजला, मी धावून येतो 

तुझ्या अबोल प्रीतीचा, मी शब्द होतो..


तुझ्या नजरेत एव्हाना, मी दाटून येतो 

दे मजला एक दान, मी भिक्षुक होतो.. 


गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो..


                                                 - तेजश्री शिंदे ✍️





Comments

  1. 👍👍👍👍👏👏👏👏👏

    ReplyDelete
  2. Khup छान दी 👌👌

    ReplyDelete
  3. Khup छान दी 👌👌

    ReplyDelete
  4. Khooop chaaan di

    ReplyDelete
  5. Khooop chaaan di

    ReplyDelete
  6. खुप सुंदर शब्दांकन...गंध दे अंतरीचा मी दरवळून येतो... केवळ अप्रतिम👌👌👌👌

    ReplyDelete
  7. So romantic, I became nostalgic, my heart ran towards my collage days. Awesome

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your kind words. It's wonderful to connect through shared emotions and experiences.😊🙏

      Delete
  8. Very nice, touched my heart

    ReplyDelete
  9. Very Nice 🌹
    अति बहुत सुंदर गंध...

    ReplyDelete
  10. खुप सुंदर अंतरीचा ठाव घेणारी व सुंदर आठवणी मनात जागृत करणारी कविता,

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 😊🙏

      Delete
  11. मस्त लेख आवडला

    ReplyDelete
  12. अप्रतिम आणि रमणीय 💐

    ReplyDelete
  13. अप्रतिम शब्द रचना...गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो ! प्रेमाचा दरवळ हा असाच असतो.. अगदी नकळत सर्वदूर पसरणारा. वापरलेल्या सर्व उपमा अतिशय चपखल बसल्या आहेत... पावसाचा मेघ, अबोल प्रीत, गुलाबी रंग...आणि याउप्पर दे मजला एक दान, मी भिक्षुक होतो ... शब्दांची ही आर्तता मन पिळवटून टाकते. ... तेजू तू शब्दांची जादूगार आहेस... एकाचवेळी तरल आणि तेवढीच परखडता तुला उत्तम साधता येते. तुझ्या रचना या नेहेमीच आपल्याशा वाटत राहतात.. एक कविता किमान चार वेळ वाचली तरी वाचक म्हणून प्रत्येकवेळी ती आणखीन एक अनुभुती देतच राहते. नक्कीच या मागची प्रेरणा ही या कविते इतकीच गोड असणार यात काही शंका नाही...!😃😃

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर अभिप्राय करिता मनापासून धन्यवाद 😊🙏

      Delete
  14. मॅडम अप्रतिम कविता... जणू अमर बोलत आहे असा भास झाला. तुमची सखी आणि अमरची पत्रे भुरळ घालणारी आहेत. बर्‍याच दिवसांपासून अमरचे पत्र आलेले नाही. त्याचे पत्र वाचायला नक्की आवडेल.😍😍

    ReplyDelete
    Replies
    1. अमर आणि सखी ही लेखक म्हणून माझी ही आवडती लेखनमाला आहे. अमरचे पत्र लवकरच येईल अशी आशा आहे. धन्यवाद 😊🙏

      Delete
  15. साद घाल मजला, मी धावून येतो
    तुझ्या अबोल प्रीतीचा, मी शब्द होतो ..
    अप्रतिम ओळी... कसे सुचते असे. खूपच भारी.

    ReplyDelete
  16. गंध प्रितीचा 🌺 गालावरच्या खळीवर मन भावलं.... तीच ते नाजुक लाजून हळव बोलन.... हृदयाचा कप्प्यात घर करून बसलं... नव्याने भेटून ते नात प्रितीच जुळलं.... ✍️

    ReplyDelete
    Replies
    1. कवितामय अभिप्रायासाठी धन्यवाद 😊

      Delete
  17. मागणे आणि देणे ह्या दोन बाजू खूप महत्वाच्या आहेत..
    देणाऱ्याने देत जावे...
    तुझ्या कवितेत मात्र एक मागणी आहे आणि त्याबदल्यात खूप काही देणे आहे...
    काय मागणी आहे ...
    एक स्पर्श..
    एक गंध अंतरीचा..
    एकांतीची एक भेट..
    एक साद...
    एक दान...
    अंतरीचा एक गंध...

    आणि मागणी च्या बदल्यात खूप काही परत देणे आहे. अप्रतिम आणि अचूक शब्द, कमी शब्दात खूप काही भावना, आणि वरवर सहज वाटत असली तरी खूप आर्त असा अर्थ व्यक्त करणारी कविता....
    शेवटी एवढंच....खूप छान Teju....

    अझहर

    ReplyDelete
    Replies
    1. अझहर... कोणत्याही नात्याला या दोन बाजू असतातच. संवाद त्याशिवाय साधता येणे केवळ अशक्य. इथेही प्रियकराची आपली अशी मागणी आहे आणि त्याबदल्यात प्रेयसीसाठी अनेक गोष्टी देण्याची तयारी आहे. तुझे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे याद वादच नाही... कवितेला समजून घेणारा दर्दी रसिक आहेस.
      धन्यवाद अझहर.

      Delete
  18. अप्रतिम शब्दरचना... teju ... अमर च्या पत्राची मीही वाट पहात आहे. अतिशय वेगळ्या धाटणीची पत्रे आहेत ती.प्रगल्भता,सामाजिक भान आणि गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन यामुळे ती पत्रे खास आहेत. please लवकर लिही.😁😁

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.