गंध.. प्रेमाचा दरवळ!
गंध..
तुझ्या एका स्पर्शाने, मी फुलून येतो
गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो..
भेट एकांती मला, मी हरपून येतो
मेघ हो पावसाचा, मी मृदगंध होतो..
बहरता हा वसंत, मी मोहरून येतो
गाली गुलाबी रंगाचा, मी मधुमास होतो..
साद घाल मजला, मी धावून येतो
तुझ्या अबोल प्रीतीचा, मी शब्द होतो..
तुझ्या नजरेत एव्हाना, मी दाटून येतो
दे मजला एक दान, मी भिक्षुक होतो..
गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो..
- तेजश्री शिंदे ✍️

👍👍👍👍👏👏👏👏👏
ReplyDeleteKhup छान दी 👌👌
ReplyDeleteKhup छान दी 👌👌
ReplyDeleteKhooop chaaan di
ReplyDeleteKhooop chaaan di
ReplyDeleteखुप सुंदर शब्दांकन...गंध दे अंतरीचा मी दरवळून येतो... केवळ अप्रतिम👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much sir 😊
DeleteSo romantic, I became nostalgic, my heart ran towards my collage days. Awesome
ReplyDeleteThank you for your kind words. It's wonderful to connect through shared emotions and experiences.😊🙏
DeleteSpeechless
ReplyDeleteVery nice, touched my heart
ReplyDeleteVery Nice 🌹
ReplyDeleteअति बहुत सुंदर गंध...
Awsome madam
ReplyDeleteछान
ReplyDeleteखुप सुंदर अंतरीचा ठाव घेणारी व सुंदर आठवणी मनात जागृत करणारी कविता,
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 😊🙏
Deleteमस्त लेख आवडला
ReplyDeleteअप्रतिम आणि रमणीय 💐
ReplyDeleteThank you Dnyaneshwar
Deleteअप्रतिम शब्द रचना...गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो ! प्रेमाचा दरवळ हा असाच असतो.. अगदी नकळत सर्वदूर पसरणारा. वापरलेल्या सर्व उपमा अतिशय चपखल बसल्या आहेत... पावसाचा मेघ, अबोल प्रीत, गुलाबी रंग...आणि याउप्पर दे मजला एक दान, मी भिक्षुक होतो ... शब्दांची ही आर्तता मन पिळवटून टाकते. ... तेजू तू शब्दांची जादूगार आहेस... एकाचवेळी तरल आणि तेवढीच परखडता तुला उत्तम साधता येते. तुझ्या रचना या नेहेमीच आपल्याशा वाटत राहतात.. एक कविता किमान चार वेळ वाचली तरी वाचक म्हणून प्रत्येकवेळी ती आणखीन एक अनुभुती देतच राहते. नक्कीच या मागची प्रेरणा ही या कविते इतकीच गोड असणार यात काही शंका नाही...!😃😃
ReplyDeleteइतक्या सुंदर अभिप्राय करिता मनापासून धन्यवाद 😊🙏
Deleteमॅडम अप्रतिम कविता... जणू अमर बोलत आहे असा भास झाला. तुमची सखी आणि अमरची पत्रे भुरळ घालणारी आहेत. बर्याच दिवसांपासून अमरचे पत्र आलेले नाही. त्याचे पत्र वाचायला नक्की आवडेल.😍😍
ReplyDeleteअमर आणि सखी ही लेखक म्हणून माझी ही आवडती लेखनमाला आहे. अमरचे पत्र लवकरच येईल अशी आशा आहे. धन्यवाद 😊🙏
Deleteसाद घाल मजला, मी धावून येतो
ReplyDeleteतुझ्या अबोल प्रीतीचा, मी शब्द होतो ..
अप्रतिम ओळी... कसे सुचते असे. खूपच भारी.
गंध प्रितीचा 🌺 गालावरच्या खळीवर मन भावलं.... तीच ते नाजुक लाजून हळव बोलन.... हृदयाचा कप्प्यात घर करून बसलं... नव्याने भेटून ते नात प्रितीच जुळलं.... ✍️
ReplyDeleteकवितामय अभिप्रायासाठी धन्यवाद 😊
Deleteमागणे आणि देणे ह्या दोन बाजू खूप महत्वाच्या आहेत..
ReplyDeleteदेणाऱ्याने देत जावे...
तुझ्या कवितेत मात्र एक मागणी आहे आणि त्याबदल्यात खूप काही देणे आहे...
काय मागणी आहे ...
एक स्पर्श..
एक गंध अंतरीचा..
एकांतीची एक भेट..
एक साद...
एक दान...
अंतरीचा एक गंध...
आणि मागणी च्या बदल्यात खूप काही परत देणे आहे. अप्रतिम आणि अचूक शब्द, कमी शब्दात खूप काही भावना, आणि वरवर सहज वाटत असली तरी खूप आर्त असा अर्थ व्यक्त करणारी कविता....
शेवटी एवढंच....खूप छान Teju....
अझहर
अझहर... कोणत्याही नात्याला या दोन बाजू असतातच. संवाद त्याशिवाय साधता येणे केवळ अशक्य. इथेही प्रियकराची आपली अशी मागणी आहे आणि त्याबदल्यात प्रेयसीसाठी अनेक गोष्टी देण्याची तयारी आहे. तुझे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे याद वादच नाही... कवितेला समजून घेणारा दर्दी रसिक आहेस.
Deleteधन्यवाद अझहर.
अप्रतिम शब्दरचना... teju ... अमर च्या पत्राची मीही वाट पहात आहे. अतिशय वेगळ्या धाटणीची पत्रे आहेत ती.प्रगल्भता,सामाजिक भान आणि गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन यामुळे ती पत्रे खास आहेत. please लवकर लिही.😁😁
ReplyDelete😄😄 लिहिते लवकरच
Delete