अबोला...हास्यात कैद असलेला!

 

अबोला 


घडल्यात कैक बाबी 

माझ्या तुझ्यात आहे..

यावेळचा अबोला 

सखे, जीवघेणा आहे..


नसल्यास शब्द तेथे 

नजरेत व्यक्त आहे..

आलाप शब्दसांभार 

हास्यात कैद आहे..


सुकलेत प्राण माझे 

व्याकुळ भाव आहे..

मौनात जायबंदी 

हा शब्दवेडा आहे..


घडल्यात कैक बाबी 

माझ्या तिच्यात आहे..


यावेळचा अबोला 

सखे, जीवघेणा आहे!


                                     - तेजश्री शिंदे ✍️

Comments

  1. Awesome.... Great... Amazing...

    ReplyDelete
  2. अप्रतिम...👌

    ReplyDelete
  3. 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान

    ReplyDelete

  5. आपल्या मनात चाललेलं
    आवडणाऱ्या व्यक्तीला सारं बोलुन टाकायचं
    असतं, पण हे असं करणं
    तेही त्या नात्याला न गमावता
    प्रत्येकालाच जमत नसतं.

    ReplyDelete
    Replies
    1. मुळात नात... हे फुलणारं असावं नाही का... बर्‍याचदा आपल्याला व्यक्ति आवडते पण ती आपलीच रहावी ही आसक्ती ही असते आणि मग तिथे सगळी गल्लत होते. त्यामुळे संवाद खुंटतो. मनमोकळेपणाने व्यक्त होता येत नाही. प्रेमात आसक्ति पेक्षा अद्वैत भाव असावा...मग सगळेच छान व्यक्त होत जाते.😊😊😊😊

      Delete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. क्या बात, बहुत खूब

    ReplyDelete
  8. Teju,
    आपल्या प्रिय व्यक्तीचा अबोला खरंच जीवघेणा असतो. ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला असेल त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. एखाद्याशी तरी असा अबोला होतोच होतो. त्यातही ज्याच्यासोबत अबोला आहे ती व्यक्ती समोर आल्यावर नजरेतून ज्या भावना व्यक्त होतात त्यासुद्धा तू मोजक्या शब्दात मांडल्या आहेस. प्रेमाच्या प्रवासातील अबोला आणि दुरावा ह्या अश्या संकल्पना आहेत ज्या अनुभवल्या शिवाय कळत नाहीत की त्या किती जीवघेण्या असतात.
    नेहमी प्रमाणे कमी आणि अचूक शब्द, नेमकी भावना मांडणारे परिणामकारक शब्द. वरवर सहज आणि सोपी वाटणारी आणि एक आर्त भावनेचा अर्थ व्यक्त करणारी कविता. 100 पैकी 100 मार्क्स Teju.
    शेवटी एका शब्दात खूप छान...
    Azhar.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद अझहर 😊😊

      Delete
  9. नसल्यास शब्द तेथे
    नजरेत व्यक्त आहे..
    आलाप शब्दसांभार
    हास्यात कैद आहे..

    वाह... काय शब्द आहेत. अबोला सहन होतो जेव्हा तो नजरेतून व्यक्त होत रहातो... डोळ्यांची अशी एक भाषा असतेच की.. पण जेव्हा तो संवाद (आलाप) आणि त्या संवादाचा शब्द भांडार व्यक्त करणारे स्मित हास्य देखील कैद होऊन जाते तेव्हा प्रियकराची होणारी घालमेल अचूक शब्दात टिपली आहेस. भावना व्यक्त करने कोणी तुझ्याकडून शिकावे.

    अतिशय अर्थपूर्ण रचना!

    ReplyDelete
    Replies
    1. अर्थपूर्ण विवेचनाकरिता मनापासून धन्यवाद 😊🙏

      Delete
  10. मौनात जायबंदी हा शब्दवेडा आहे..आणि आम्ही सगळेच वाचक तुझ्या शब्दांचे वेडे आहोत.

    ReplyDelete
  11. खूपच छान... मनाला भावेल असे.

    ReplyDelete
  12. Beautiful writting maam

    ReplyDelete
  13. अप्रतिम रचना... तुझ्या इतकेच सुंदर असे तुझे शब्दसौंदर्य आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.