रात्र...पुन्हा उमेदीने बहरून येणारी!

 रात्र

रात्रीस सवाल 

करावा आताशा

कि स्वप्नांची दारे 

पुन्हा ठोठवावी.. 


नको ते शहारे 

जुन्या आठवांचे

पुन्हा-पुन्हा रात्र 

काळी ठरावी..


फुटावे उमाळे न

जुन्या आसवांना 

पुन्हा खेळ तोची

जिव्हारी ठसावा..


नको ते सरावे 

जुन्या जाणिवांचे 

पुन्हा उमेदीने 

रात्र बहरून यावी..


नव्या स्वप्नमाला 

नभी चंद्र-तारा

पुन्हा प्रीत दारी 

उमलू पहावी..


फुलांनी रात सारी 

मोहरून जावी..!

                                              - तेजश्री 





















Comments

  1. Awesome.... So touching....

    ReplyDelete
  2. Awesome 👍👍👍👍👍

    ReplyDelete
  3. It's soul touching

    ReplyDelete
  4. खूप सुंदर कविता आहे

    ReplyDelete
  5. Apratim 💐👌

    ReplyDelete
  6. सुंदर

    ReplyDelete
  7. खूप हृदयस्पर्शी कविता, तेजू .. हृदयातील एक नाजूक कप्पा हळुवार उघडणारी.. ओथंबलेल्या भावनांना वाट करून देणारी.. मनात सलत असलेलं दुःख अन्‌ त्यामुळे होणार्‍या वेदना व्यक्त करणारी.. अन्‌ अंती.. वेदनेच्या राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी मारू पाहणारी!!

    कात टाकूनी गतजन्मीची
    स्वच्छ पुसावे अंतरंग
    अंत जुन्या युगाचा
    नव्या युगाचा प्रारंभ!

    👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खरं तर.... हे वर्ष सरता सरता आपण काय मिळवले याचे ठोकताळे शोधत असताना सुचलेली ही कविता आहे. यातली "रात्र" ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे नैराश्य आहे... दुःख आहे... कडवट अनुभव आहेत...नको नको वाटणारे अनेक प्रसंग आयुष्यात येवून जातात.....पण प्रत्येक रात्रीनंतर उषःकाल होणारच...हे अबाधित सत्य आहे.. म्हणून तर दुःखानंतर सुख हे कालचक्र निश्चित आहे. या प्रवासात आपल्याला हवा असतो संयम...ये दिन भी गुजर जाएंगे... हा विश्वास! पुन्हा बहरण्याचा काळ येणारच ही शाश्वती..!!😊😊😊

      Delete
    2. अगदी खरंय.. 👍

      Delete
  8. मनाला प्रफुल्लित करणारी कविता.

    अशाच कवितांचा आस्वाद घेण्याची संधी आम्हाला पुन्हा पुन्हा मिळो.
    सुंदर कविता मॅडम...
    धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.