आठवणींचा दडलेला एक कप्पा म्हणजे...जुनं पुस्तक 📖
जुनं पुस्तक धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं आज डोकं वर काढलं अन् इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर पुन्हा हातात येवून विसावलं..! पहिल्याच पानावर तुझी अक्षर त्यात रेंगाळत राहिली माझी बोटं शोधत तुझा पहिला परिस स्पर्श पुन्हा फुलून आलं अंग-अंग..! पहिल्या प्रेमाची कथा अन् कोवळ्या मनांच्या व्यथा सांगत पुस्तकाच्या पानांत दडलेलं गुलाबाचं फुल पुन्हा दरवळंल..! धूळखात पडलेल्या जुन्या पुस्तकानं आज डोकं वर काढलं.. - तेजश्री शिंदे