रातराणी.. नाजूक हळव्या भावनांची !

 

रातराणी


गोड गुलाबी 

 यामी फुलते 

रातराणी ती 

गाली हसते 


वाऱ्याला ही 

भरते कापरे 

रातगंध तव 

बेभान पसरे 


आकाशी चा 

चंद्रही खुलला

तिच्या यौवना

तोही भुलला 


अशी नाजूका

शुभ्र कांतीची 

जणू प्रेमिका 

त्या रात्रीची


 जणू प्रेमिका 

त्या रात्रीची..

                                - तेजश्री शिंदे 



- काही गोष्टी इतक्या नाजूक आणि सुंदर असतात की त्यांचा नुसता सहवास देखील सुखावतो. त्यांचे अस्तित्व आपले आयुष्य सुगंधीत करून जाते... या नाजूक फुलासारखी हळव्या मनाची अनेक नाती आपण आयुष्यभर कोणत्याही कारणाशिवाय अतिशय निःस्वार्थ भावनेने जपत रहातो. अशाच खास व्यक्तींसाठी ही नाजूक, हळवी  कविता... रातराणी !


Comments

  1. Teju ek sundar kavita sangrah kadh ata tu....

    ReplyDelete
  2. चंद्राच्या शीतल प्रकाशात...
    प्रीत अलवार बहरून आली ...
    गंधाळले श्वास श्वासात आणि रातराणी बहरून आली...

    ReplyDelete
  3. खूप छान तेजू.. नाजूक नात्यांचे चित्र अतिशय सुंदर शब्दरंगांत रेखाटले आहेस.. नाजूक नात्यांचं असंच असतं.. जितकं नाजूक तितकं सुंदर.. नाजुकता कमी झाली की सुंदरतेला ग्रहण लागतं..

    गाली रातराणीच्या
    गोड खळी पडावी
    ह्या मधुर रात्रीची
    कधी पहाट ना व्हावी!

    मर्मबंध नात्यांचे
    असेच हळुवार जपावे
    मी फक्त तिचा
    अन्‌ तिने माझे व्हावे!

    ReplyDelete
    Replies
    1. जेवढ्या ताकदीची माझी कविता झाली त्याच्याही पेक्षा अधिक ताकदीचा तुझा अभिप्राय आहे. मनापासून धन्यवाद मंगेश!😊😊
      काय सुंदर ओळी लिहिल्या आहेस.. ही शब्दांची देवाण घेवाण सुरेख जमली आहे.😃👌👌👌

      Delete
  4. नजाकत ...तु रेखाटलेल्या नात्यांच्या चित्रात रातराणीसम बहरली आहे..मी परत परत तुझ्या कवितांच्या प्रेमात पडते आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 😍🙏

      Delete
  5. मुळात आपल्या कवितेच्या ओळी वाचून एखाद्याला काहीतरी सुचावं आणि त्याने ते शब्दबद्ध करावं हे खरच खूप भारी आहे...शब्द मुळात असतातच भावना व्यक्त करायला त्यात तुम्हा वाचकांचे बहरलेले शब्द वाचून "ओनामा" म्हणून केलेली सुरुवात सार्थकी झाल्यासारखे वाटते. असेच अभिप्राय देत रहा.😊🙏

    ReplyDelete
  6. Apratim kavita !

    ReplyDelete
  7. तेजू...मुळात या सगळ्याच भाव भावनांनी तू ओतप्रोत भरलेली आहेस...तुझ्या सगळ्याच कविता या किमान 4 ते 5 वेळा वाचाव्या लागतात... कारण त्या तू लिहिल्या आहेस आणि त्यातील प्रत्येक शब्द हा अनेक भावना व्यक्त करणारा असा असतो... अशीच लिहित रहा.. तुझा हा प्रवाहीपणा अखंड वाहत राहो.

    ReplyDelete
  8. खुपच भारी....तरल 😍👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.