कॅथॉरसिस..सुप्त विचारांची घुसळंण!


 कॅथॉरसिस


सहज निर्माण झालेली पोकळी 

शोधत रहाते बंध-अनुबंध 

का? कशासाठी? कुणास ठाऊक

ते दोन शब्द सुद्धा उभारी देवून जातात,

पण..

ती वेळ देखील येवू पहात नाही.


आपण जखडत चाललो आहोत,

प्रेमात; मोहात नि गुरफटून गेलोय स्वतःत,

हे समजण्या पलीकडचे जग..

उलगडून पाहण्याचे धैर्य... कोठून आणू ?


तुला समजावून सांगणे आता

कठीण होऊन बसले आहे,

शब्द थिटे पडत आहेत..अन् घसा कोरडा,

हे अनोळखी शब्द कोडे 

कधीच उलगडणार नाही का ?


हा कॅथॉरसिस काय देवू पहात आहे? 

ही घुसळंण थांबतच नाही 

प्रश्नांवर उत्तरे शोधणे... हा प्रवास 

आपल्या जिवंतपणाचे लक्षण 


आपण सहप्रवासी या युगाचे 

कि... युगा-युगान्तराचे 

ही क्षण भंगुर पोकळी 

दोन विचारांमधला उच्छ्वास...!

                                                  - तेजश्री शिंदे 



Comments

  1. Heart touching

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. घुसळंण थांबतच नाही
      प्रश्नांवर उत्तरे शोधणे... हा प्रवास
      आपल्या जिवंतपणाचे लक्षण
      आपण सहप्रवासी या युगाचे

      मस्त

      Delete
  4. कॅथॉरसिस.. हा शब्दच मुळात खूप खोल आहे.. त्यात तुमची ही रचना विचार करायला भाग पाडते. ही सुप्त विचारांची घुसळंण वाचकाला एक वेगळीच अनुभुती देवून जाते.

    ReplyDelete
  5. Very deep thoughts ma'am👌👌

    ReplyDelete
  6. ही क्षण भंगुर पोकळी
    दोन विचारातील उच्छ्वास.. अतिशय वैचारिक कविता.. अप्रतिम शब्दसंपदा!

    ReplyDelete
  7. Very profound 👌👌

    ReplyDelete
  8. अप्रतिम

    ReplyDelete
  9. सुंदर रचना 😍👌👌👌👌

    ReplyDelete
  10. तुझी कविता म्हणजे भावनांचा समुद्र आहे.... deep ♥️

    ReplyDelete
  11. सुरेख 👌🏻👌🏻👌🏻विचारांची सखोल भावनिक घुसळण 👍🏻👍🏻👍🏻😍❤️

    ReplyDelete
  12. खूपच अप्रतिम लेखणी सौंदर्य...

    ReplyDelete
  13. भावनिक प्रगल्भता! स्वतःला स्वतः मध्ये शोधण्याचा अथक प्रयत्न!. ह्या प्रक्रियेत आपल्याशी निगडीत असणार्‍या सर्व घटकांशी होणारे द्वंद्व अन्‌ त्यामुळे मनाची होणारी घालमेल ह्याचे नितांत सुंदर वर्णन! त्याला वैफल्य अन्‌ नैराश्याची एक नाजूक किनार!
    भूतकाळात घेऊन गेली ही रचना! तेजू👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मंगेश.. भावनांचा कॅथॉरसिस ही खरच घालमेल होणारी क्रिया आहे.. आणि तेवढीच सुप्त.

      Delete
  14. जितकी तुझे विचार प्रगल्भ तितकीच तू आणि तुझे शब्द रहस्यमयी आहेत Teju.. तुझे शब्द एकदाच वाचले असे कधी झाले नाही. ते वारंवार वाचत असतो मी किंबहुना वाचावेसे वाटतात मला.
    जितके पुन्हा पुन्हा वाचले जातात तेवढे ते आपला अर्थ व्यक्त करतात. आजची तुझी रचना सुद्धा वारंवार वाचली. एक अनामिक पोकळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात राहत असते.
    ते बंध अनुबंध आणि उभारी देणारे शब्द, ती न येणारी वेळ. खरंच गुरफटत चाललोय आपण प्रेमात मोहात. हे जग आहे तसे पहण्याचे धैर्य सुद्धा आपल्यात नाही. समजवणारे खूप समजवत आहेत, त्यांचे शब्द थिटे पडले, घसा कोरडा पडला, आपले प्रश्न मात्र संपत नाही आणि विचारांची घुसळण थांबत नाही..
    अप्रतिम, अर्थपूर्ण आणि अगदी मार्मिक शब्द. एखाद्या ऐतिहासिक किंवा रहस्यमयी नाटकाच्या रंगमंचावर तो भरदार नायक हातवारे करून ह्या शब्दांची उधळण करत आहे आणि मी खुर्चीला खिळून मनापासून ते ऐकत आहे असा भास होत आहे. की हा सगळा अभ्यास होय पोकळीचा? की घुसळण विचारांची?

    -अझहर

    ReplyDelete
    Replies
    1. तुझा अभिप्राय म्हणजे एक सखोल परीक्षण असते... अझहर! कवि ला यापेक्षा आणखी काय हवय. वाचकाचे इतके प्रगल्भ अभिप्राय वाचून माझ्याही लिखाणात त्याची भर पडत जाते.. हा एक समग्र प्रवास आहे. त्यात तुमच्यासारखे सह प्रवासी असतील तर होणार्‍या प्रवासाची मजा काही औरच. 😊😊😊🙏🙏🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.