बोध.. मी माणूस असल्याचा!
बोध
कविता आणि प्रेम या दोनच गोष्टी आहेत,
जिथे मला 'मी' माणूस होण्याचा बोध होतो.
अविरत चालत राहणार्या या प्रवासात,
मी शून्यवत होत चालल्याचा भास होतो.
विचारांच्या गर्तेत अडकलेल्या आयुष्यात,
घडणार्या घटनांवर अविश्वासाचा ठराव होतो.
बोथट भावनांचा पूर अन शोधार्थाची परिक्रमा,
माझ्याच समुद्रमंथनातून अविचारांचा र्हास होतो.
नवअंकुरित आत्मबीजाचा स्वार्थत्याग करत,
शांतीच्या गर्भात नव जाणिवांचा उषःकाल होतो.
माझ्यात पुन्हा पुन्हा 'मी'
माणूस असल्याचा बोध होतो.

Very nice 👌👍🙏
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteHats off mam ji...Lai.. bhari
ReplyDeleteApratim...shabd apuure comments karita..
Thank you so much 😊
Delete👌🏻👌🏻
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteThanks Satish
Deleteखूप छान कविता आहे.
ReplyDeleteThanks Akshay
Deleteअप्रतिम लिहिली आहेस कविता. भावार्थ कळायला थोडी अवघड आहे जड आहे पण पुन्हा पुन्हा वाचली की मग नीट आणि व्यवस्थित कळू शकते.👍👌
ReplyDeleteThank you सौरभ दा😊
DeleteVery deeeeeep...😊
ReplyDeleteThank you
Deleteअंतर्मनाच्या पटलावरील अबोल शब्दांकन. सुंदर.
ReplyDelete