बोध.. मी माणूस असल्याचा!

बोध 


कविता आणि प्रेम या दोनच गोष्टी आहेत,

जिथे मला 'मी' माणूस होण्याचा बोध होतो.


अविरत चालत राहणार्‍या या प्रवासात,

मी शून्यवत होत चालल्याचा भास होतो. 


विचारांच्या गर्तेत अडकलेल्या आयुष्यात,

घडणार्‍या घटनांवर अविश्वासाचा ठराव होतो. 


बोथट भावनांचा पूर अन शोधार्थाची परिक्रमा,

माझ्याच समुद्रमंथनातून अविचारांचा र्‍हास होतो.


नवअंकुरित आत्मबीजाचा स्वार्थत्याग करत,

शांतीच्या गर्भात नव जाणिवांचा उषःकाल होतो.


माझ्यात पुन्हा पुन्हा 'मी'

माणूस असल्याचा बोध होतो.


                                                      - तेजश्री शिंदे 


Comments

  1. Very nice 👌👍🙏

    ReplyDelete
  2. खूपच छान

    ReplyDelete
  3. खूपच छान

    ReplyDelete
  4. Hats off mam ji...Lai.. bhari
    Apratim...shabd apuure comments karita..

    ReplyDelete
  5. 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. खूप छान कविता आहे.

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिहिली आहेस कविता. भावार्थ कळायला थोडी अवघड आहे जड आहे पण पुन्हा पुन्हा वाचली की मग नीट आणि व्यवस्थित कळू शकते.👍👌

    ReplyDelete
  8. Very deeeeeep...😊

    ReplyDelete
  9. अंतर्मनाच्या पटलावरील अबोल शब्दांकन. सुंदर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.