वाळवण.. आयुष्यभराचा अनुभव!
वाळवण.
आम्ही चार भावंड
आक्की थोरली अन् मी शेंडेफळ घरचं
वर्षाकाठी आक्की आली की घर भरून जायचं
तिच्या दोन पिल्लांनी सगळंच गजबजायचं
सासुरवाशीण लेक आली म्हणून चूलही आनंदायची
आईतली अन्नपूर्णा ओसंडून वहायची
गोड धोड सुगंधाणं घर भरून जायचं
आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...!
आई - बा ला बघून 'ती' बोल बोल बोलायची
दोन आसवं गाळत गार्हाणं सारं सांगायची
चिंगी आजून लहान आहे तिला मात्र शिकू दे
पायावरती उभी कर थोडं जग बघू दे
तिच्या मारे शब्दांनी पोटात सारं कालवायचं
बाई म्हणून तीच जगणं मनाला चुटपूटायच
काय बर चुकलं असेल सारख मनात यायचं
शिक्षणाच महत्व तेव्हा खरं समजायचं
आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...!
काळ सरून गेला अन् मी मोठी झाले
आक्कीचे शब्द मनात घर करून गेले
पायावर उभी राहून जग सारे पाहिले
आक्कीच्या नजरेतील विश्व उलगडले
बाई म्हणून अवघडच पुन्हा परत येणं
निर्णय घेऊन आयुष्याला नवी उभारी देणं
आक्की आजही येते वर्षाकाठी
तिच्या पिल्लांसह
अन् भरभरून देवून जाते
तिच्या अनुभवांच वाळवण.
तिच्या अनुभवांच वाळवण.

मस्त आहे कविता,
ReplyDeleteवाह! ताईचं दुःख, खंत न सांगताही कवितेत मांडली आहे. खूप सुंदर शब्द रचना. अक्काने तिची स्वप्न लहान बहिणीत पहिली.. मोठी बहीण ही अनेकदा आईचं प्रतिरूप असते
ReplyDeleteधन्यवाद सुहास..!
Deleteमस्त...
ReplyDeleteवा.. मस्तच... आम्ही चार भावंडं तर नाही.. पण मी आणि माझी बहीण ... तिचं ही लग्न झाल. तीही घरी आली की घर भरून जाते. तीच माझा मागे खंबीर उभे राहणे.. आयुष्यात बहिणीचे नातं खूप महत्त्वाचं असतं. मला माझा बहिणी मध्ये आईचं दिसते. आक्की म्हणजे माझी ताई आणि शेंडेफळ.. मी 😂
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे ..👌 ताईच आठवली. ❤️तिला ही शेअर करते.
आजूनही बहिणी वर एक छान लेखन होवुदे.❤️
तुला ताई आठवली यातच सगळे आले.
Deleteखूप सुंदर कविता आहे मॅडम
ReplyDeleteThanks Amar...
Delete
ReplyDeleteखर तर काहीच सुचत नाहीये.... काय लिहावं.. पण तरी लिहायचं तर आहेच♥️ दोन बहिणीं मधल अखंड प्रेम आणि इतक्या सुंदर पद्धतीने मांडलय..... वाह....अप्रतीम
मोठी बहीण असणं खरच किती महत्वाचं असत हे आज या कवितेतून पुन्हा एकदा जगले 😇 खूपच सुंदर
मनापासून आभार❤️
सखी💌
या कवितेचा उगम तुम्ही दोघी बहिणीच आहात.. लिहिताना तुमची आठवण आलीच.
DeleteKhup ch chan teju
ReplyDeleteThank you 😊
DeleteKhup chan
ReplyDeleteThank you.
Deleteसुरेख
ReplyDelete😌🙏
DeletePerfectly described 👌
ReplyDeleteThank you 😊
DeleteTeju तुझं लिखाण हे खूप भावनिक आणि वास्तव असते. त्याला तू नेमक्या शब्दात मांडतेस.
ReplyDeleteअक्की आणि तिची पिले घरी आल्यावर घरात काय बदल होतात अगदी चुलीपासून ते अंगणापर्यंत, आईची अन्नपूर्णा ओसंडून वाहने आणि घर बोलू लागणे. काय होत असेल परिस्थिती याचे चित्र उभे राहते. कारण यात काही अनुभव स्वतःचे आहेत माझे.
आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तू अगदी भावनिक स्पर्श करून मांडली आहेस. ती म्हणजे स्त्री शिक्षण आणि तिने तिच्या पायावर उभे राहणे याचे महत्त्व. अक्की ने तिच्या नजरेतून पाहिलेले जग, चिंगी ने ही ते पाहिले पण शिक्षित होवून आणि स्वतःच्या पायावर उभे राहून. प्रत्येक वर्षाकाठी अक्कीच्या अनुभवांचे वाळवण चिंगी ला भेटले आणि चिंगी अनुभव समृध्द झाली हे सांगायला देखील चिंगी विसरली नाही.
खरंच अवघड आहे का ग बाई म्हणून परत येणं, निर्णय घेवून नवी उभारी घेणं. कवितेच्या ओळीत ,बाईपण, आईपण, माहेरपण सगळ अगदी अलगद चित्रित केले आहेस. खूप छान....
अशी आक्की प्रत्येक घरात असतेच.. लग्नसंस्थेला बळी पडलेली घरातील पहिली मुलगी. त्यानंतर मात्र ती इतर भावंडाना नेहेमीच शिकण्याचा सल्ला देते. स्वताच्या अस्तित्वाचा शोध घेत बाईने आर्थिक रित्या स्वावलंबी असावे असेही तिला वाटते... सविस्तर अभिप्रायाबद्दल आभार!
Deleteखूप छान आणि वाचनीय लीहतेस teju तू
DeleteThank you 😊
Deleteप्रत्येक घरातली आक्की तुझ्या कवितेतून प्रतिबिंबित झाली. आपण आजूबाजूला पाहून उमजूनच शिकत जातो. आवडली ही कविता
ReplyDeleteधन्यवाद मित्रा..! आजूबाजूच्या घटना, प्रसंग बघून अस्वस्थ होऊनच लिहिली आहे.
Deleteघरातील आनंदोत्सव फार चांगल्या शब्दात मांडला....
ReplyDeleteस्तुत्य !!!!
Thank you Vinod 😊
Deleteअनुभवाचं टिकाऊ आणि सकस वाळवण देण्यासाठी, जो दाह घरातील प्रत्येक थोरलं व्यक्तिमत्व सजगपणे आणि सहजतेने सोसत असतं त्यांच्या काळजाला भिडणारी ही कविता आहे. भन्नाट लिहिलयसं तायडे! :-)
ReplyDeleteआक्की म्हणून माझाही स्वतःचा असा एक वेगळा प्रवास आहेच की.. तुमच्यासोबत केलेला! 😊
Deleteखूप छान पुन्हा एकदा बालपण आठवल. खूप छान लेखन केले आहे.
ReplyDeleteThank you.
DeleteKhoob Sundar
Deleteखुप सुरेख👌
ReplyDeleteChhan madam
ReplyDeleteही कविता वाचताना खरंच बालपण आठवले. काळ पुढे जात राहतो, उरतात त्या फक्त आठवणी.
Deleteखर तर हे लेखन करणं खुप अवघड असत प्रतेक शब्द विचार पुर्वक आणि काही जुन्या आठवणी व त्यातील एक क्षण जो आयुष्भर आठवणीत राहतील असे बरच अनुभव व त्यातुन मिळालेली पेरणा. ही खुप काही शिवकत असते त्यातुन. काविता व. चांगलें विचार निर्माण होत असतात..
ReplyDeleteAbsolutely awesome...
ReplyDelete