वाळवण.. आयुष्यभराचा अनुभव!




वाळवण.


आम्ही चार भावंड 

आक्की थोरली अन् मी शेंडेफळ घरचं

वर्षाकाठी आक्की आली की घर भरून जायचं 

तिच्या दोन पिल्लांनी सगळंच गजबजायचं

 

सासुरवाशीण लेक आली म्हणून चूलही आनंदायची 

आईतली अन्नपूर्णा ओसंडून वहायची 

गोड धोड सुगंधाणं घर भरून जायचं

आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...!


आई - बा ला बघून 'ती' बोल बोल बोलायची

दोन आसवं गाळत गार्‍हाणं सारं सांगायची 

चिंगी आजून लहान आहे तिला मात्र शिकू दे 

पायावरती उभी कर थोडं जग बघू दे


तिच्या मारे शब्दांनी पोटात सारं कालवायचं

बाई म्हणून तीच जगणं मनाला चुटपूटायच 

काय बर चुकलं असेल सारख मनात यायचं 

शिक्षणाच महत्व तेव्हा खरं समजायचं


आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...!


काळ सरून गेला अन् मी मोठी झाले 

आक्कीचे शब्द मनात घर करून गेले 

पायावर उभी राहून जग सारे पाहिले

आक्कीच्या नजरेतील विश्व उलगडले 


बाई म्हणून अवघडच पुन्हा परत येणं

निर्णय घेऊन आयुष्याला नवी उभारी देणं


आक्की आजही येते वर्षाकाठी 

तिच्या पिल्लांसह 

अन् भरभरून देवून जाते 

तिच्या अनुभवांच वाळवण.


तिच्या अनुभवांच वाळवण.


                                - तेजश्री शिंदे 





Comments

  1. मस्त आहे कविता,

    ReplyDelete
  2. वाह! ताईचं दुःख, खंत न सांगताही कवितेत मांडली आहे. खूप सुंदर शब्द रचना. अक्काने तिची स्वप्न लहान बहिणीत पहिली.. मोठी बहीण ही अनेकदा आईचं प्रतिरूप असते

    ReplyDelete
  3. मस्त...

    ReplyDelete
  4. वा.. मस्तच... आम्ही चार भावंडं तर नाही.. पण मी आणि माझी बहीण ... तिचं ही लग्न झाल. तीही घरी आली की घर भरून जाते. तीच माझा मागे खंबीर उभे राहणे.. आयुष्यात बहिणीचे नातं खूप महत्त्वाचं असतं. मला माझा बहिणी मध्ये आईचं दिसते. आक्की म्हणजे माझी ताई आणि शेंडेफळ.. मी 😂
    खूप छान लिहिलं आहे ..👌 ताईच आठवली. ❤️तिला ही शेअर करते.
    आजूनही बहिणी वर एक छान लेखन होवुदे.❤️

    ReplyDelete
    Replies
    1. तुला ताई आठवली यातच सगळे आले.

      Delete
  5. खूप सुंदर कविता आहे मॅडम

    ReplyDelete

  6. खर तर काहीच सुचत नाहीये.... काय लिहावं.. पण तरी लिहायचं तर आहेच♥️ दोन बहिणीं मधल अखंड प्रेम आणि इतक्या सुंदर पद्धतीने मांडलय..... वाह....अप्रतीम
    मोठी बहीण असणं खरच किती महत्वाचं असत हे आज या कवितेतून पुन्हा एकदा जगले 😇 खूपच सुंदर
    मनापासून आभार❤️
    सखी💌

    ReplyDelete
    Replies
    1. या कवितेचा उगम तुम्ही दोघी बहिणीच आहात.. लिहिताना तुमची आठवण आलीच.

      Delete
  7. Khup ch chan teju

    ReplyDelete
  8. Perfectly described 👌

    ReplyDelete
  9. Teju तुझं लिखाण हे खूप भावनिक आणि वास्तव असते. त्याला तू नेमक्या शब्दात मांडतेस.
    अक्की आणि तिची पिले घरी आल्यावर घरात काय बदल होतात अगदी चुलीपासून ते अंगणापर्यंत, आईची अन्नपूर्णा ओसंडून वाहने आणि घर बोलू लागणे. काय होत असेल परिस्थिती याचे चित्र उभे राहते. कारण यात काही अनुभव स्वतःचे आहेत माझे.
    आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तू अगदी भावनिक स्पर्श करून मांडली आहेस. ती म्हणजे स्त्री शिक्षण आणि तिने तिच्या पायावर उभे राहणे याचे महत्त्व. अक्की ने तिच्या नजरेतून पाहिलेले जग, चिंगी ने ही ते पाहिले पण शिक्षित होवून आणि स्वतःच्या पायावर उभे राहून. प्रत्येक वर्षाकाठी अक्कीच्या अनुभवांचे वाळवण चिंगी ला भेटले आणि चिंगी अनुभव समृध्द झाली हे सांगायला देखील चिंगी विसरली नाही.
    खरंच अवघड आहे का ग बाई म्हणून परत येणं, निर्णय घेवून नवी उभारी घेणं. कवितेच्या ओळीत ,बाईपण, आईपण, माहेरपण सगळ अगदी अलगद चित्रित केले आहेस. खूप छान....

    ReplyDelete
    Replies
    1. अशी आक्की प्रत्येक घरात असतेच.. लग्नसंस्थेला बळी पडलेली घरातील पहिली मुलगी. त्यानंतर मात्र ती इतर भावंडाना नेहेमीच शिकण्याचा सल्ला देते. स्वताच्या अस्तित्वाचा शोध घेत बाईने आर्थिक रित्या स्वावलंबी असावे असेही तिला वाटते... सविस्तर अभिप्रायाबद्दल आभार!

      Delete
    2. खूप छान आणि वाचनीय लीहतेस teju तू

      Delete
  10. प्रत्येक घरातली आक्की तुझ्या कवितेतून प्रतिबिंबित झाली. आपण आजूबाजूला पाहून उमजूनच शिकत जातो. आवडली ही कविता

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा..! आजूबाजूच्या घटना, प्रसंग बघून अस्वस्थ होऊनच लिहिली आहे.

      Delete
  11. घरातील आनंदोत्सव फार चांगल्या शब्दात मांडला....

    स्तुत्य !!!!

    ReplyDelete
  12. अनुभवाचं टिकाऊ आणि सकस वाळवण देण्यासाठी, जो दाह घरातील प्रत्येक थोरलं व्यक्तिमत्व सजगपणे आणि सहजतेने सोसत असतं त्यांच्या काळजाला भिडणारी ही कविता आहे. भन्नाट लिहिलयसं तायडे! :-)

    ReplyDelete
    Replies
    1. आक्की म्हणून माझाही स्वतःचा असा एक वेगळा प्रवास आहेच की.. तुमच्यासोबत केलेला! 😊

      Delete
  13. खूप छान पुन्हा एकदा बालपण आठवल. खूप छान लेखन केले आहे.

    ReplyDelete
  14. खुप सुरेख👌

    ReplyDelete
  15. Replies
    1. ही कविता वाचताना खरंच बालपण आठवले. काळ पुढे जात राहतो, उरतात त्या फक्त आठवणी.

      Delete
  16. खर तर हे लेखन करणं खुप अवघड असत प्रतेक शब्द विचार पुर्वक आणि काही जुन्या आठवणी व त्यातील एक क्षण जो आयुष्भर आठवणीत राहतील असे बरच अनुभव व त्यातुन मिळालेली पेरणा. ही खुप काही शिवकत असते त्यातुन. काविता व. चांगलें विचार निर्माण होत असतात..

    ReplyDelete
  17. Absolutely awesome...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.