Posts

Showing posts from February, 2023

पुस्तकातील पानापानांतून..

Image
              पुस्तकातील पानापानांतून..                                पुस्तकातील पानांसारखं                                 तुलाही वाचता आलं असतं                                 तर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं                                 शोधली असती पुढच्या पानात..                                शब्दांची कोडी उलगडत                                 घेतला असता शोध                            ...

सखी'चे पत्र (7)...अजुनही भिरभिरणारी!

Image
              सखी'चे पत्र  (7) प्रिय अमर,               ऑफिसातून घरी आले आणि फ्रेश होऊन खोलीबाहेर  निघताना सहज आरशात पाहिलं.. आणि स्वतःच्याच प्रतिबिंबावर हसू आलं. बघ हं ! म्हणजे आपण आयुष्यभर आपल्या वरवरच्या देखण्या रूपावर किती प्रेम करतो..पण तेच आपण आपल्या वैचारिक सुंदरतेकडे दुर्लक्ष करीत रहातो. हे असे आपण जाणूनबुजून करतो असे अजिबात नाही... पण यावर समाजाच्या अव्याहत चालत आलेल्या रुढी परंपरांचा जबरदस्त पगडा आहे हे निश्चित.                प्रत्येक फुलाचा उमलण्याचा आपला एक कालावकाश असतोच. मोगरा उमलून आला म्हणून गुलमोहर नाही ना बहरू शकत. अगदी लहानपणापासून हा खेळ सुरू असतो...आणि ते आपल्या इतके अंगवळणी पडले आहे की पोपटाला पिंजर्‍यात वर्षानुवर्षे कोंडून ठेवून अचानक त्याचा पिंजरा उघडून आकाश दाखवले तरी त्याला त्या आकाशाची तसूभरही ओढ वाटत नाही. तो त्याच पिंजर्‍याभोवती घुटमळत रहातो...विहंगणारा पक्षी असूनही.               स्त्रियांच्या बाबती...

तेरी याद में...

Image
तेरी याद में... 

त्याग..आत्मिक शांतिकडे नेणारा..!

Image
                  त्याग                       आपण आपल्याच आत्ममंथनात रुजत                     ढवळून काढावे अंतरंग                     नि वेध घ्यावा मनाचा                      स्वः यातनेकडून प्रेमाकडे जाणारा..                     अवधानात्मक चिंतन विचारातून                      गाठावा कळस अनमोल आनंदाचा                     पहावे अमूर्तरूप शारीरिक बंधाकडून                     आत्म-मिलनाकडे नेणारे..                     समर्पित भावनेने करावा त्याग           ...

आंदण..'ती'चा स्विकार!

Image
  आंदण मी जंग जंग पछाडले  मुक्तीच्या वाटा तुडवत, रक्तबंबाळ या पावलांनी  परतीचा मार्ग पाहिला नाही. होय मी कधीच स्त्रीत्वाचा  त्याग केला नाही. मी निर्वस्त्र होऊन अनुभवले  स्त्रीच्या गर्भार वाटा, मुसमुसूलेल्या रात्रीच्या  उसवत्या रेघान रेघा मी आयुष्याला फुलवत गेले  जगण्याच्या आशा उंचावत, घुसमटलेल्या जीवाने, कधीच 'हाय' म्हंटले नाही. मी बाईपण उलगडले  शोधत माणुसकीच्या खुणा, बापाने दिलेले आंदण  रागाने झिडकारले नाही. होय मी कधीच स्त्रीत्वाचा  त्याग केला नाही.                                           - तेजश्री शिंदे 

सखी'चे पत्र (6).. वसंत बहरताना!

Image
            सखी'चे पत्र (6) प्रिय अमर,               तुझे पत्र मिळाले आणि अनेक न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. मुळात अंतरिक अपेक्षा ही होतीच आणि आहे ही..पण काळाच्या ओघात ते एखाद्याला हक्काने सांगणे मात्र विरून गेलंय. आपली म्हणणारी काहीएक वर्षांनी आपलीच वाटेनाशी होतात... त्यांच्यातील बदल हा सतत टोचत रहातो... एकमेकांवर कुरघोडी करत ते कधी बाजूला होतात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. त्यामुळे माझी ओढ मी फारच व्यक्तीशः ठेवली आहे. माझे स्वतःचे आपले म्हणून एक विश्व आहे आणि त्यावर अधिराज्य ही माझ्याच विचारांचे!.. त्यामुळे तुला कधीच उशीर झाला नाही. तू व्यक्त होण्यासाठी तुझे तुझे घेतलेले ते स्वातंत्र्य आहे. तुझ्या भावना अन् विचारांचा मी नेहमीच आदर राखला आहे. मुळात आपल्या नात्यातच खूप अघळपघळ स्पेस आहे. तुझ्या पत्राची आतुरतेने वाट पहात होते..कारण कोणत्याही नात्यात संवाद हा हवाच.                तू व्यक्ती म्हणून नव्हे तर एक व्यक्तिमत्त्व म्हणून मी तुझ्या आकंठ प्रेमात आहे... हे काही वेगळे सा...

संदिग्ध प्रवास ..तुझ्या-माझ्या असण्याचा!

Image
   संदिग्ध प्रवास   अनपेक्षितपणे बोलून गेलेल्या गोष्टी, प्रत्यक्षात तितक्याच सहजतेने होतील.. अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. सरत गेलेली वेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेली, तुझ्या विचारांच्या सौंदर्याने..! माझ्या भावनांची वीण इतकी घट्ट असतानाही  तुझे स्वतःचे अवकाश निर्माण करणे मला थक्क करून जाते. कुठून आणलेस एवढे औदार्य.. आणि इतकी सहजता कशी साधलीस  तुझ्या माझ्या असण्यात..?? हा संदिग्ध प्रवास  कोणतेही ध्येय न साधणारा  तरीही हवाहवासा वाटणारा.. कल्पनाविश्वात रमणारा  आणि तरीही सत्यात उतरणारा नामहीन, गंधहीन, रंगहीन सोहळा  सुरवंटाला फुलपाखरू करणारा, स्वः अवकाशात विहंग करणारा, प्रवास तुझ्या-माझ्या असण्याचा..!  प्रवास तुझ्या-माझ्या जगण्याचा..!!                                                    - तेजश्री शिंदे 

निर्बुद्ध.... एक नवा अध्याय!

Image
निर्बुद्ध मी माझ्याच निर्बुद्धिचा एक नवा अध्याय होते  विझलेल्या त्या पणतीची न जळालेली वात होते  घेतले कवेत जेव्हा ते फुललेले तारुण्य होते  सुकलेल्या त्या फुलांचा मी पसरलेला गंध होते  माझ्याच जाणिवेचा मी उसळता विचार होते  मुक्तीच्या त्या सुरांनी भारलेला राग होते  आयुष्याच्या युद्धाचा मीच श्रीकृष्ण होते  ताणलेल्या शिवधनुष्याचा मी उभारी बाण होते  जीवनाच्या अनुभवांचा कोळलेला सार होते  जगलेल्या त्या क्षणांतील मी अव्यक्त काव्य होते  मी भविष्याचा ध्यास घेते  भूतकाळाचा अन्वर्थ घेते  वर्तमानाला छाटणारी मी दुधारी तलवार होते  मी माझ्याच निर्बुद्धिचा एक नवा अध्याय होते                                                               - तेजश्री शिंदे 

वाळवण.. आयुष्यभराचा अनुभव!

Image
वाळवण. आम्ही चार भावंड  आक्की थोरली अन् मी शेंडेफळ घरचं वर्षाकाठी आक्की आली की घर भरून जायचं  तिच्या दोन पिल्लांनी सगळंच गजबजायचं   सासुरवाशीण लेक आली म्हणून चूलही आनंदायची  आईतली अन्नपूर्णा ओसंडून वहायची  गोड धोड सुगंधाणं घर भरून जायचं आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...! आई - बा ला बघून 'ती' बोल बोल बोलायची दोन आसवं गाळत गार्‍हाणं सारं सांगायची  चिंगी आजून लहान आहे तिला मात्र शिकू दे  पायावरती उभी कर थोडं जग बघू दे तिच्या मारे शब्दांनी पोटात सारं कालवायचं बाई म्हणून तीच जगणं मनाला चुटपूटायच  काय बर चुकलं असेल सारख मनात यायचं  शिक्षणाच महत्व तेव्हा खरं समजायचं आक्की घरी आली की घर बोलू लागायचं...! काळ सरून गेला अन् मी मोठी झाले  आक्कीचे शब्द मनात घर करून गेले  पायावर उभी राहून जग सारे पाहिले आक्कीच्या नजरेतील विश्व उलगडले  बाई म्हणून अवघडच पुन्हा परत येणं निर्णय घेऊन आयुष्याला नवी उभारी देणं आक्की आजही येते वर्षाकाठी  तिच्या पिल्लांसह  अन् भरभरून देवून जाते  तिच्या अनुभवांच वाळवण. तिच्या अनुभवांच वाळवण.   ...

अमर'चे पत्र..(2) बिफोर व्हॅलेंटाईन ..!

Image
                           अमर'चे पत्र   सुहृदय सखी,                     तुझी सर्व पत्रे मला नियमित मिळतात आणि मी ती पुन्हा पुन्हा वाचली ही. उत्तर न पाठवल्यामुळे कदाचित तुला ती मिळाली का वगैरे वाटलं असेल... आणि प्रत्येक पत्राची स्वतःचीच अंतरिक अपेक्षा असते उत्तराची. पत्र लिहीणाऱ्या माणसाची तर असतेच..! त्यातही ज्या पत्रात मनाच्या अगदी खोलवर असलेलं काढून मांडलं असेल तर उत्तराची वाट देखील मन तेवढ्याच आतुरतेनं पाहतं. हे सगळं पाहता मला उशीरच झाला तुझ्या पत्रांना उत्तर द्यायला. माफी असावी. माझा हा ही अपराध ओठांवर घे...!                   तुझे पत्र वाचले. कधी कधी वाटतं तुझे शब्द जे घडलं त्यापेक्षा जास्त उत्कट असतात. अशीच रहा... अनुभवांना ते असतात त्यापेक्षा जास्त समृद्ध करणारी..! मला तुझ्यासारखं अलंकारिक नाही लिहिता येत आणि वरून मला तुझ्यासारखं मोकळं ढाकळं व्यक्त ही नाही होता येत. तरी आज ठरवून लिहायला बसलो.     ...

तेरी मुस्कान...

Image
               तो गुस्ताख़ी ना समझना..                     मेरी आहट ने तेरे चेहरे की लकीरें बदल दी, तेरे मुस्कान को इश्क़ का नाम दूँ,  तो गुस्ताख़ी ना समझना।  यू तोह हम ठहरें फ़कीर मिजाज के  तेरे सहारे बैठे तोह शायर बन गए! वो चुप्पी भी कमाल की साधी आपने  अल्फाज़ भी ना निकले और फ़साने बयां हो गए।  वो ख़ामोशी ना मोहताज़ हुईं लबों की  मेरे साँसों में अटक के दिलों को छू गई! तेरा अंदाज़ ये प्यार भी कुछ अलग सा था  जिस्मों को रूह से मिला के चला गया! तेरे छूने से मेरे ख़यालों का रुख ही बदल गया, इस एहसास को हम इश्क़ समझे, तो गुस्ताख़ी ना समझना।                                                                                             ...

सखी'चे पत्र (5)... उत्कटता

Image
                      पत्र (5) प्रिय अमर,                                           कसा आहेस?? आज वातावरण एकदम बहारदार आहे इथे....तुझ्या आठवणींचा मोहर आज बहरून आलाय. एखादी मस्त रोमँटिक कविता लिहून रिते व्हावे वाटते... माझ्यापेक्षा यात तुझा हातखंडा जास्त आहे...तुझ्या कविता फार बोलक्या असतात.... विषयाचे कोणतेही आढेवेढे न घेता थेट शब्दांनी तू ह्रदयाला स्पर्श करतोस..!                     सहज विचार आला मनात हा साधेपणा कुठून आणलास या काळात???..... काही म्हण...तुझ्या गावाने तुला दिलेलं सगळ्यात मोठं देणं आहे ते..! तुझ्यासारखे गाव सगळ्यांनाच नसते....माझे बाबा सरकारी नोकरदार असल्याने बाबांची जिथे बदली होईल तेच आमचे गाव..!! त्याकाळी किमान दहा बारा गावं तरी फिरले असेल. यानिमित्ताने गावची संस्कृती जवळून पाहता आली. चाकरमानी माणसे कामाधंद्यासाठी मुंबईत स्थलांतरित झाली....पण सणासुदीला पाय गावाकडे...

सखी'चे पत्र (4)..निघून जाणे वाईटच!

Image
                 पत्र (4) प्रिय अमर,                 वाट पाहणे हा काही माझा स्वभाव नाही...पण कधी तरी लिहीता होशील असे मात्र वाटले होते. तू जाऊन सहा महिने झाले...ऑफिसला निघण्याची तयारी करत होते... तेवढ्यात दारात पोस्टमन उभा! माझे नाव घेऊन एक पत्र माझ्या हातात देऊन तो ओझरता झाला...मी स्तब्ध...निश्चल...!                  माझे नाव आणि पत्ता ज्या वळणदार अक्षरात लिहिले होते ते पाहून हे सुगंधी शब्दांचे पत्र तुझेच आहे याचा सुखद व आल्हाददायक धक्का बसला. आपण गाठलेल्या वैचारिक व मानसिक पल्ल्याचा वीट येवून पुन्हा थोडे लहान होऊन तुझ्या शब्दांना अनुभवण्याची तीव्र इच्छा झाली. पत्रातील एक-एक शब्द अनुभवला.           आज ऑफिसला जाताना फिकट निळी-गुलाबी रंगाची साडी नेसण्याचा मोह झाला. साडी आवडत असली तरी वर्षातून फारफार तर चार-पाच वेळा मी नेसत असेल. तीच साडी घालून तुझ्या केबिन चा दरवाजा उघडून गुड मॉर्निंग.. अमर.. अशी हाक मारताच तुझ्या नजरेतील बंदिश गझल ब...

अमर'चे पत्र (पहिले)

Image
                                                                    अमर'चे पत्र प्रिय सखी,          माझ्यासाठी नेहेमीच कुतूहलाचा विषय असलेली, स्त्री म्हणून समोर असली तरी त्यापलीकडची एक निखळ व्यक्ती म्हणून माझ्यासमोर आलेली, विचारातली परिपक्वता, आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली, सहजता हाच जिचा शृंगार वाटावा आणि प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्याच जाणिवेतून पाहणारी अशी तू, म्हणजे माझी सखी!                  तुला "माझी" म्हणतानाही अंगावर सरकन काटा उभा राहिला. तू इतकी हवीहवीशी आहेस, पण तरीही पुन्हा तुझ्या समोर येताना पोटात गोळा येतोच. माझ्या वैचारिक भावविश्वाला काही काळासाठी तू व्यापून टाकलेस. काही म्हण पण तुझ्याकडे बघून खूप शिकण्यासारखे वाटले.. त्यात काही क्षण तुझ्यासोबत जगता आले हे म्हणजे माझ्यासारख्याला वाळवंटात पाणी मिळण्यासारखे होते. मी मितभाषी असलो तरी...