त्याग..आत्मिक शांतिकडे नेणारा..!
त्याग
आपण आपल्याच आत्ममंथनात रुजत
ढवळून काढावे अंतरंग
नि वेध घ्यावा मनाचा
स्वः यातनेकडून प्रेमाकडे जाणारा..
अवधानात्मक चिंतन विचारातून
गाठावा कळस अनमोल आनंदाचा
पहावे अमूर्तरूप शारीरिक बंधाकडून
आत्म-मिलनाकडे नेणारे..
समर्पित भावनेने करावा त्याग
नि जावे इंद्रियांच्या पलीकडे
तेव्हाच घेता येते आत्मदर्शन
बुद्धीच्या पलीकडे जाणारे..
हा कस सर्वांगीण विकासाचा
जो कानोसा घेत रहातो चित्तरूपाचा
नि वहात जाते मनोमिलनाचे वारे
आत्मिक शांतिकडे नेणारे..
आत्मिक शांतिकडे नेणारे..!!

जीवनात काय त्याग करावयाचे मार्मिक कवितेतील स्पष्ट होते
ReplyDeleteत्यागातून शांतीचा संदेश देणारी कविता. वरकरणी शद्बरचना अवघड आहे पण कवितेत खूप अर्थ दडला आहे
ReplyDeleteहो.. थोडी गर्भित आहे कविता
Deleteआयुष्यात काही करायचं असेल.. तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो....
ReplyDeleteसमर्पित भावनेने करावा त्याग
नि जावे इंद्रियांच्या पलीकडे
तेव्हाच घेता येते आत्मदर्शन
बुद्धीच्या पलीकडे जाणारे.. (lines 👌)
छान लीहले आहे.
सुरुवात 'मी' पासून झाली की आत्मिक शांतीचा मार्ग आपोआप गवसत जातो.
Deleteजेव्हा आपण एखादी गोष्ट माझी आहे असे म्हणतो तेव्हा आपण अनेक भेद करत बंधनात अडकत जातो...आणि त्यामुळे आपण एकत्वापासून दूर जातो.
Deleteखूप छान कविता आहे. तुमच्या वेगवेगळे लेख छान असतात निवांत क्षणी वाचण्यासाठी म्हणजेच शेतातल्या झाडाखाली बसून शांत आणि आनंद मिळतो म्हणजेच काही करमत नसताना तुमच्या कविता व लेख वाचला की मन असे तृप्त होतं...... तुमचा लेख कविता वाचताना खूप आनंद मिळतो...thank you.. तुमच्या कविता व लेख च्या माध्यमातून लेखच्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकण्यास मिळत असतं काही जुन्या आठवणी आणि खूप काही..
ReplyDeleteमाझे लिखाण वाचून आपल्याला आनंद मिळतो हे वाचून फार छान वाटले विकास..! आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.😊
Deleteआजचा विषय तुझा छान आहे teju. त्याग आत्मिक शांती. असे शब्द सुचने सुद्धा आपल्यात एक वैचारिक प्रगल्भता असण्याचे लक्षण आहे. स्व चा शोध, ते आत्मचिंतन आणि ते इंद्रिय पलीकडचे मनोमिलन खरंच खूप ग्रेट. आयुष्य जगताना आपण जर वैचारिक प्रगत होण्याचा प्रवास करत असू, तर विविध टप्पे येतात. त्यातीलच एक टप्पा असतो हा जिथे आपण स्व चा शोध घेतो किंबहुना स्वतःला खूप वेळ दिल्यामुळे स्व चा शोध लागतो. त्यावेळी मनाची असणारी भावना तू शब्दबद्ध केली आहेस. तसे पाहायला गेले तर त्याग आणि समर्पण हे असे दोन पैलू आहेत जे सहसा कुणाला जमत नाहीत आणि जो इथपर्यंत येतो त्याला जगण्याचं गमक सापडलेलं असत. या कवितेची सुरवात आत्मचिंतन ने होते, ती पुढे सरकत अंतरंग ढवळून, स्व यातना घेवून, शारीरिक बंधाच्या पलीकडे आत्म मिलानाकडे जाते. मग ती त्याग समर्पण सोबत इंद्रिय पलीकडे जाते, आत्म दर्शन घेते आणि आत्मिक शंतीकडे जावून लुप्त होते.
ReplyDeleteआजही मनातील भावना शब्दांकन करताना तुझा कस लागलेला जाणवत आहे प्रत्येक शब्दातून.खूप छान शब्दांची निवड केली आहेस. आणि मग त्यातून आमच्यासारख्या वाचका पर्यंत पोहोचली आहे तुझी कविता .. त्याग...
या अवस्थेपर्यंत येवून पोहोचणे तसेही कठीणच आहे... पण या सर्व प्रक्रियेत मी जे काही अनुभवले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याग ही फार मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला आत्मिक शांतिकडे घेवून जाण्याचा मार्ग सुकर करते. थोडीशी वैचारिक झाली आहे कविता पण..हळूहळू वाचली तर तिचा अर्थ उलगडत जातो. सविस्तर समीक्षण केल्याबद्दल धन्यवाद अझहर...!😌🙏
Deleteती काळजाच्या कागदावर दोन शब्द लिहून गेली, ती गोड स्वप्नाच्या कळ्यांवर हाथ फिरवून गेली...*त्याग* !!!!
ReplyDeleteवाह!
Delete