संदिग्ध प्रवास ..तुझ्या-माझ्या असण्याचा!
संदिग्ध प्रवास
अनपेक्षितपणे बोलून गेलेल्या गोष्टी,
प्रत्यक्षात तितक्याच सहजतेने होतील..
अशी पुसटशी कल्पनाही नव्हती.
सरत गेलेली वेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेली,
तुझ्या विचारांच्या सौंदर्याने..!
माझ्या भावनांची वीण इतकी घट्ट असतानाही
तुझे स्वतःचे अवकाश निर्माण करणे
मला थक्क करून जाते.
कुठून आणलेस एवढे औदार्य..
आणि इतकी सहजता कशी साधलीस
तुझ्या माझ्या असण्यात..??
हा संदिग्ध प्रवास
कोणतेही ध्येय न साधणारा
तरीही हवाहवासा वाटणारा..
कल्पनाविश्वात रमणारा
आणि तरीही सत्यात उतरणारा
नामहीन, गंधहीन, रंगहीन सोहळा
सुरवंटाला फुलपाखरू करणारा,
स्वः अवकाशात विहंग करणारा,
प्रवास तुझ्या-माझ्या असण्याचा..!
प्रवास तुझ्या-माझ्या जगण्याचा..!!

Nice 👌👍
ReplyDeleteThank you 😊
Delete❤️❤️❤️
ReplyDeleteअनपेक्षितपणे बोलून गेलेल्या गोष्टी,
ReplyDeleteप्रत्यक्षात तितक्याच सहजतेने होतील..
अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. (Beautiful lines) ❤️
Absolutely Nice 👌🤩
Thanks Riya...असे अनेकवेळा आपल्या सोबत होत असते.. अनपेक्षितपणे गोष्टी सहज घडत जातात आणि त्यातून अतिशय सुंदर बंध निर्माण होतात. जे कल्पनेच्या पलीकडचे असतात.
Deleteअप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteRegards,
CA Umashankar
Thank you उमाशंकर
DeleteKhupch chan teju👍🤘💐
ReplyDeleteChhan arthpurn Teju
ReplyDeleteThank you 😊
Delete🥰👌🥰
ReplyDelete😊😊
Delete